Himayatnagar Zilla Parishad Panchayat Samiti : हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये खळबळ

unnamed 3 Himayatnagar Zilla Parishad Panchayat Samiti : हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये खळबळ

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागावाटपाचे प्रारूप आरक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आले. तहसीलदार हिमायतनगर आणि उपविभागीय अधिकारी, हदगाव यांच्या वतीने अधिसूचना प्रसिद्ध होताच तालुक्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. अनेक इच्छुकांच्या राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली असून काहींच्या आशांवर पाणी फिरल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाच्या १२ जून आणि २२ ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या निर्देशांनुसार ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद सदस्यांच्या सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला. तर हिमायतनगर पंचायत समिती आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

आरक्षणाचे चित्र स्पष्ट
हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांत एकूण चार पंचायत समिती गण आहेत.
सरसम (बु.) गट — अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव.
सिरंजनी पंचायत समिती जागा — सर्वसाधारण
कामारी पंचायत समिती जागा — अनुसूचित जाती (महिला)

पोटा (बु.) गट — सर्वसाधारण (महिला) साठी राखीव.
कामारी पंचायत समिती जागा — अनुसूचित जाती (महिला)
पोटा (बु.) पंचायत समिती जागा — नागरिक मागासवर्ग प्रवर्ग साठी राखीव.

या आरक्षणामुळे काही इच्छुकांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे, तर काहींच्या संधी अधिक पक्क्या झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हरकतींसाठी मुदत – जाहीर झालेल्या आरक्षणावर काही हरकती असल्यास त्या नागरिकांनी तहसीलदार, हिमायतनगर यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

सोशल मीडियावर ‘भावी’ उमेदवारांचा प्रचार
आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर स्वतःला ‘भावी’ उमेदवार म्हणून मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी, शुभेच्छा पोस्टरबाजी आणि संघटनांची हालचाल सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top