HomeनांदेडFlood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला...

Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

हदगाव, गौतम वाठोरे| दरवर्षी पुराच्या पाण्याने त्रस्त असलेल्या तामसा शहरातील नदीकाठच्या वस्त्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेली उद्भवन योजना पुन्हा सुरू करण्यासोबतच संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही कार्यवाही वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुकाध्यक्ष हिदायतखान पठाण तामसेकर यांनी दिलेल्या निवेदनानंतर सुरू झाली. भोई गल्ली, हनुमान मंदिर परिसर, जामा मस्जिद आणि दर्गा मोहल्ला या भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

हिदायतखान पठाण यांनी सांगितले, “हा प्रश्न फक्त पाण्याचा नसून जनतेच्या अस्तित्वाचा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालमकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशासन हलले आणि पूरग्रस्तांच्या आक्रोशाला प्रतिसाद मिळाला. हे वंचित बहुजन आघाडीच्या संघटित शक्तीचे फलित आहे.”

IMG 20251013 WA0037 Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

पूरस्थितीचा अहवाल वेळेवर सादर करून पूरग्रस्तांच्या बाजूने भूमिका घेतल्याबद्दल तहसीलदार सुरेखा नांदे यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

हा निर्णय केवळ तामसा गावापुरता मर्यादित नसून  वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवादी नेतृत्वाने लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवल्याचा ठोस पुरावा आहे. तामसा येथील जनतेने व्यक्त केलेला विश्वास आता “वंचितांची सत्ता  न्यायाचा मार्ग!” या घोषणेच्या रूपाने बळकट होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments