HomeनांदेडDiwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व...

Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) बुधवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दीपावलीच्या निमित्ताने हिमायतनगर शहरातील व्यापारी बांधव, पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी सर्वांना संदेश देत सांगितलं की, “प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा सण असलेल्या दीपावलीने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच सदिच्छा.” शहरात आगमन होताच प्रथम त्यांनी हिमायतनगरचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मतदार संघातील सर्व मायबाप जनतेच्या सुखसमृद्धीची कामना केली. हिमायतनगर शहरातील व्यापारी वर्ग, नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचा आनंद व्यक्त करत त्यांना प्रतिसाद दिला. जवळगावकर यांनी दिलेल्या दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव व भेटी गाठीच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिमायतनगर शहर परिसर त्यांचा चाहता वर्ग किती मोठ्या संख्येने आहे हे दिसून आले.

IMG 20251022 162743 Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा
Oplus_16908288

यावेळी त्यांच्यासोबत हिमायतनगरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, गणेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, माजी सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे, माजी संचालक शेख रफिक शेख महेबूब, माजी जिल्हा परिषद सदस्य समाज खान, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण कोमावार, दिलीप लोहरेकर पाटील, सुभाष शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी शहराध्यक्ष संजय माने, बाळू अण्णा चवरे, सुभाष दारवंडे, योगेश चिलकावार, अंकुश मोरे, पंडित ढोणे, अब्दुल बाखी, पत्रकार पांडुरंग गाडगे, सोपान बोंपीलवार, आदिसह आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणूक साठी इच्छुक असलेल्याची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments