हदगाव, गौतम वाठोरे| दत्ता मेघे उच्च शिक्षण व संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (वर्धा) यांच्या विद्यमाने आणि हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील तामसा येथे २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तामसा व परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.



शिबिराचे उद्घाटन हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर पाटील चाभरेकर होते. या वेळी मंचावर विकास देवसरकर, बबन कदम, युवा जिल्हाध्यक्ष संदेश सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शितल भांगे, हिमायतनगर तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, मंचक कदम, अशोक पवार, पांडुरंग कदम, रतन महाराज गिरी, केशव हरण, माधव नारेवाड, सुभाष धुरमुरे, संतोष ठमके, शिवराज कदम, विवेक कदम, सुदर्शन मनुलेकर, पोलीस पाटील संघपाल लोणे, राजेश तावडे, तुकाराम तवर, दिनेश नरवाडे, गजानन अनंतवार, जयदीप पाटील कोळीकर, दिलीप कोथळकर, गजानन कल्याणकर, गजानन आगलावे, संदीप बंडेवार, राजू लामतुरे, प्रदीप तवर, साईनाथ फुलारे, किशोर घंटलवार, सुरेश ठाकरे, धनराज सोनटक्के, ज्ञानेश्वर विभुते, शरद दुगाळे, सुनील चव्हाण, सुरज तवर यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.



“२० टक्के राजकारण, ८० टक्के समाजकारण” या शिवसेनेच्या ब्रिदवाक्यानुसार आमदार बाबुराव पाटील कोहळीकर हे जनतेच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.हदगाव, तामसा, निवघा, तळणी, हिमायतनगर आदी ठिकाणी त्यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमुळे अनेक रुग्णांना गंभीर आजारातून दिलासा मिळाला आहे. अनेक रुग्णांचे मेघसावंगी (वर्धा) रुग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तामसा येथे दुसऱ्यांदा भरविण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, स्थानिक नागरिकांनी आमदार कोहळीकर यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.




