हदगांव,गौतम वाठोरे l इतिहासाचे अभ्यासक म्हणून नांदेड सह आजुबाजुच्या जिल्ह्यात सर्व परीचीत असलेले धनगर समाजाचे युवा नेते प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांची नुकतीच काँग्रेसच्या ओबीसी प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सोमवार 19 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे हे नागपुर येथुन नांदेड कडे जात असताना हदगाव शहर पळसा,बरडशेवाळा येथे समाज बांधवासह विविध क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात स्वागत केले.



तर हदगांव तालुक्याच्या वतीने वडकुते पेट्रोल पंपासमोर श्रीनिवास हुलकाने यांच्या धनगरवाडा हाँटेलमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सुनील भाऊ सोनुले, नामदेवराव जाधव, साहेबराव मेटकर, कृष्णा पवार ,यांनी स्वागत केले तर यावेळी समाज बांधवांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य दिंगाबर साखरे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश फुलारी राजवाडीकर, डॉ बि.के.निळे, पत्रकार यादव सुकापुरे, पत्रकार गजानन सुकापुरे, आनंदराव मस्के बरडशेवाळा, डॉ.घुन्नर, नेवरीकर ,निरंजन दहेकर, अवधूत चोंढेकर, विठ्ठलराव मस्के पळसेकर, प्रभाकर डुरके हदगांव, विविध क्षेत्रातील मंडळी समाज बांधव उपस्थित होते.




