Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Voting : 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

Voting : 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| महाराष्ट्र राज्यात मंजिल पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात 10 नोव्हेंबर 2025 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारी अर्जांची पडताळणी 18 नोव्हेंबर 2025 अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर 2025 अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज ...
Final voter list : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द

Final voter list : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 27 ऑक्टोबर 2025 च्या पत्रान्वये नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी संबंधित तहसिल कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे....
Politics Special : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “स्वयंघोषित भावी” उमेदवारांची लगबग – जनतेची दिशाभूल की विकासाचा दिखावा?

Politics Special : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “स्वयंघोषित भावी” उमेदवारांची लगबग – जनतेची दिशाभूल की विकासाचा दिखावा?

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार | आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आचारसंहिता व तारीख जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असताना शहरात विविध स्वयंघोषित “भावी उमेदवारांची” लगबग वाढली असून, जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली केवळ प्रसिद्धीसाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर "मीच शहराचा विकास करू शकतो" अशी हौसेने केलेली पोस्टांची रेलचेल सुरू असून, २५ ते 30 वर्षे वयाच्या तरुणांपासून ते मागील १५ वर्षांपासून "राजकारणात सक्रिय" असल्याचा दावा करणारे अनेक जण जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही पक्षाचे तिकीट मिळेल याची खात्री नसतानाही “मीच पुढचा लोकनायक” असा आव आणून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली केवळ वैयक्तिक स्वा...
Zp Election news: शहापूर जिल्हा परिषदेसाठी “आयात” उमेदवाराची लॉटरी लागण्याची शक्यता!

Zp Election news: शहापूर जिल्हा परिषदेसाठी “आयात” उमेदवाराची लॉटरी लागण्याची शक्यता!

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गण हा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असल्याने आगामी निवडणुकीत या गणात राजकीय गणिते रंग घेत आहेत. स्थानिक काही इच्छुकांनी विविध पक्षांकडून उमेदवारीची मागणी केली असली, तरी “जनतेचा पाठिंबा मिळाला तरच निवडणूक लढवू, अन्यथा घरीच राहू — कारण खर्च करण्याची ताकद नाही,” अशी भूमिका काही संभाव्य उमेदवारांनी घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर ‘आयात’ उमेदवाराची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवण्यात अडचणी येत असल्याने विविध पक्षांनी बाहेरून उमेदवार आणण्याची चाचपणी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून नदूर येथील एका इच्छुकाचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून तमलूर येथील बँकेच्या सौभाग्यवतींचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे चिरंजीव मैदानात उतरण्याची तयारी करत आ...
Mp Ashok Chavhan : शिव्या देत मते मागणे हा काहींचा धंदा — खा. अशोकराव चव्हाण यांचा टोला

Mp Ashok Chavhan : शिव्या देत मते मागणे हा काहींचा धंदा — खा. अशोकराव चव्हाण यांचा टोला

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील मोंढा बाजारपेठेत सोमवारी भाजपची जनसंवाद सभा पार पडली. या सभेत खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार (वि.प.) हेमंत पाटील यांनी खा. चव्हाण यांच्यावर टिकाटिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले, “शिव्या देत मते मागणे हा काहींचा धंदा झाला आहे. माझं नाव शंभर वेळा घेऊन जप करण्यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काय विकास केलात, हे दाखवा.” ते पुढे म्हणाले, “नकारात्मक राजकारणामुळे नांदेड जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. मी आजवर नेहमी विकासात्मक कामांनाच प्राधान्य दिले आहे. नांदेडमधून विमानसेवा सुरू झाली, वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली, प्रधानमंत्री आवास योजनेतून १६ हजार घरे पूर्ण झाली आहेत आणि २० लाख घरांचे नियोजन सु...
Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई | आज मुंबईतील वरळी येथील डोम (MNCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नांदेड उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान मा. अजितदादा पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून पक्षाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत पक्षाची विचारधारा, कार्य आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले. ...
Graduate voter registration : पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Graduate voter registration : पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने स्विकारण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. परंतू विभागातील काही कार्यालयाकडून पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने न करता ऑनलाईन करण्यात यावेत असे सांगण्यात येत असल्याची तोंडी तक्रारी येत आहेत. त्यामुळे, पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावेत, याबाबतची सूचना जिल्हास्तरावरुन सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.  ...
MLA Shrijaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून १४.५० कोटींची विकासकामे मंजूर

MLA Shrijaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून १४.५० कोटींची विकासकामे मंजूर

नांदेड, राजकीय
नांदेड| भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी १४.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, याबाबतचे शासन निर्णय देखील निर्गमित झाले आहेत. आ. श्रीजया चव्हाण यांनी सदर निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयान्वये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर व मुदखेड नगरपरिषद आणि अर्धापूर नगर पंचायतीला विशेष रस्ते अनुदान तसेच नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून भोकर, मुदखेड व अर्धापूर शहरातील रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे भोकर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी २.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये पाणंद रस्ते,नळकांडी पूल तसेच गावांतर्गत नाल्यांचे ...
Ncp politics meeting : किनवट व माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

Ncp politics meeting : किनवट व माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

नांदेड, राजकीय
किनवट / माहूर प्रतिनिधी │आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी किनवट व माहूर येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व आमदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच किनवट-माहूर विधानसभेचे युवा नेते सचिन नाईक यांची विशेष उपस्थिती होती. हिमायतनगर येथे बैठकीस जात असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी किनवट तालुकाध्यक्ष श्री....
Himayatnagar : हिमायतनगर येथे आमदार बाबुराव कोहळीकर व आमदार आनंद बोंढारकर यांची धावती भेट

Himayatnagar : हिमायतनगर येथे आमदार बाबुराव कोहळीकर व आमदार आनंद बोंढारकर यांची धावती भेट

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या धावत्या भेटीचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या भेटीवेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आज किनवट येथे होणाऱ्या पक्ष बैठकीच्या अनुषंगाने जात असताना आमदारांनी हिमायतनगर येथे थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भेटीदरम्यान स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी कशी मजबूत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक विजय वळसे पाटील, शहर ...
error: Content is protected !!