मुंबई | आज मुंबईतील वरळी येथील डोम (MNCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.


या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नांदेड उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


बैठकीदरम्यान मा. अजितदादा पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून पक्षाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत पक्षाची विचारधारा, कार्य आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले.


नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी जिल्ह्यातील राजकीय स्थिती, युतीसंदर्भातील भूमिका तसेच आगामी निवडणुकांची तयारी यावर सविस्तर माहिती मांडली.


या बैठकीला राज्याचे सहकारमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील, मा. ना. नरहरी झिरवळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर, माजी मंत्री आ. श्री. धनंजय मुंडे, आ. श्री. संजय खोडके, आ. श्री. शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आ. विक्रम काळे, तसेच प्रवीण पाटील चिखलीकर (प्रदेश सरचिटणीस) यांसह जिल्ह्यातील मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी — नागनाथराव घीशेवाड, अभिषेक लुटे, सखाराम वाघमारे, अफरोज पठाण, शिवाजी लगलुतकर, वैजनाथ करपुडे, एकनाथ जाधव, सुरेश बिल्लेवाड, आत्माराम कपाटे, हनुमंतराव नटूरे, निळू पाटील, वामनराव पाटील वडगावकर, विजय राठोड, रामदास (बाळू) पाटील पवार, जवाज भाई बरबडेकर, साबेर शेख, शेख साजिद, खाजा भाई, अमोल पाटील धुमाळे, सईद पीरपाशा, अब्दुल अली चाऊस आदींनी उपस्थिती लावली. या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक बांधणी बळकट करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा सर्वत्र फडकवण्याचा निर्धार करण्यात आला.


