Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sangeetabai Rathod ; संगीताबाई राठोड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड – मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा

Sangeetabai Rathod ; संगीताबाई राठोड यांची सरपंच पदी बिनविरोध निवड – मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे l तालुक्यातील सर्वात टोकाचे समजल्या जाणाऱ्या मरडगा येथील ग्रामपंचायत वर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांचे बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली सविस्तर वृत्त असे की मरडागा ग्रामपंचायतीवर महिला ओबीसी राखीव असलेल्या अनुसयाबाई बापूराव जाधव हे सरपंच पदावर कार्यरत होत्या परंतु दोन महिन्यापूर्वी त्यांचा हृदयविकारांच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याने सदरील सरपंच पदाची जागा रिक्त होती. त्यामुळे त्याजागी वार्ड क्रमांक तीन मधील वंचित बहुजन आघाडीच्या सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची सरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली व मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविला आहे यावेळी मंडळ अधिकारी महाळनर मॅडम,तलाठी नरवाडे ग्रामसेवक कराळे. उपसरपंच गजानन नरवाडे, रणजित बगाटे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते ग...
Kha. Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराच्या मदतीचे वितरण सुरू!: खा. अशोकराव चव्हाण

Kha. Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराच्या मदतीचे वितरण सुरू!: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते घेण्यासाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदतीचे वितरण सुरु झाल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. सोशल मीडियावरून ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, रब्बी हंगामासाठी मदत म्हणून नांदेड जिल्ह्याला ७२७.९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. ही मदत कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामात भाजप महायुती सरकारने एकूण १४०...
Abdul Akhil Bhai : हिमायतनगरच्या विकासासाठी दृढ नेतृत्व, विकासाभिमुख चेहरा म्हणून अब्दुल अखिल भाई यांच्या नावाची जोरदार चर्चा

Abdul Akhil Bhai : हिमायतनगरच्या विकासासाठी दृढ नेतृत्व, विकासाभिमुख चेहरा म्हणून अब्दुल अखिल भाई यांच्या नावाची जोरदार चर्चा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी सक्षम, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार अब्दुल अखिल भाई हे भावी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ लागले आहेत. हिमायतनगर ही केवळ एक नगरी नसून, ती आपल्या भावना, संघर्ष आणि स्वप्नांचे प्रतीक असल्याचे सांगत अखिल भाई यांनी शहराच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडला आहे. त्यांच्या संकल्पनांनुसार शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आणि सुरक्षित वस्तींची निर्मिती, प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पुरवठा, शिक्षण, रोजगार आणि प्रगतीसाठी समान संधी, स्वच्छ, हरित आणि आधुनिक हिमायतनगराची उभारणी हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अखिल भाई म्हणतात, “विकास म्हणजे फक्त इमारती आणि जमीन नव्हे, तर समाधानी नागरिक आ...
Deglur Municipal Council : देगलूर नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलाच्या टप्प्यावर — काँग्रेसचे पारडे जड

Deglur Municipal Council : देगलूर नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलाच्या टप्प्यावर — काँग्रेसचे पारडे जड

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. माजी नगराध्यक्ष मोगलाजी ईरन्ना शिरशेटवार यांच्या अध्यक्षतेपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले असून, सध्या नगरपरिषदेत काँग्रेसचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. त्या वेळी झालेल्या सरळ लढतीत काँग्रेसचे मोगलाजी शिरशेटवार यांनी लक्ष्मीकांत पदमवार यांचा पराभव करून नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावर कब्जा केला होता. त्या वेळी नगरपरिषदेत एकूण 25 नगरसेवक होते, त्यापैकी बहुमत काँग्रेसकडे होते. अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि उपाध्यक्ष बालाजी टेकाळे यांच्यासह सुशील देगलूरकर, आलीमुन्निसा सय्यद, योगेश्वरी तोटावार, महमूद शेख, जयश्री काब्दे, अनिल बोन्लावार, कमलबाई वानखेडे, शैलेश उल्लेवार, महानं...
Deputy Collector Anup Patil : आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे – उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन

Deputy Collector Anup Patil : आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे – उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, तिचे काटेकोर पालन करणे ही सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांची जबाबदारी आहे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केले. ते नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत देगलूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भातील निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले, “आचारसंहिता ही केवळ प्रशासनिक बंधन नसून, लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पाया आहे. तिचे पालन करणे प्रत्येक नागरिक, उमेदवार आणि पक्षाची जबाबदारी आहे.” या वेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलम कांबळे, तसेच पोलीस निरीक्षक मार...
Shahapur Zilla Parishad : शहापूर जिल्हा परिषदेची उमेदवारी शासकीय कर्मचारी व उद्योगपतींना देऊ नये – जनतेची मागणी

Shahapur Zilla Parishad : शहापूर जिल्हा परिषदेची उमेदवारी शासकीय कर्मचारी व उद्योगपतींना देऊ नये – जनतेची मागणी

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर जिल्हा परिषद गण मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने सध्या या ठिकाणी निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मात्र, या निवडणुकीत शासकीय कर्मचारी व उद्योगपती विविध पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून, सामान्य जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जनतेचा ठाम आवाज असा आहे की, “ज्यांनी पक्षासाठी निष्ठेने आणि ईमानदारीने काम केले, अशाच कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी; उद्योगपती व शासकीय कर्मचारी यांना नाही.” गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणारे, नेत्यांची सेवा करणारे, जनतेच्या अडचणींमध्ये धावून जाणारे कार्यकर्ते यांना वारंवार उमेदवारीपासून वंचित ठेवले जात असल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. उलट, जनतेशी फारकत घेतलेले उद्योगपती आणि सरकारी कर्मचारी निवडणूक जवळ आली की मतदारसंघात फिरताना दिसतात. ते जनतेच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा निवडण...
Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : युती की स्वतंत्र लढत ?

Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : युती की स्वतंत्र लढत ?

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुका जाहीर करताच हिमायतनगर शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी धाव घेत असून, प्रत्येक जण आपले वर्चस्व दाखवून “स्वबळाचा नारा” देत आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती टिकणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुती व महाआघाडीच्या पद्धतीने झाल्या असल्या, तरी हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक मात्र त्या धर्तीवर होईल असे सध्या तरी दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर महायुतीकडून एकत्र लढण्याचा निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असल्याचे चित्र आहे. हिमायतनगर नगरपंचायतीवर सुरुवातीची अडीच वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र, काही बंडखोर नगरसेवकांच्या विरोधामुळे पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष प...
Former Chief Minister Ashok Chavan “नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या, विकास करून दाखवू !” – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

Former Chief Minister Ashok Chavan “नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या, विकास करून दाखवू !” – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मजबूत सत्ता आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर आमचे सरकार असल्याने विकासकामांसाठी कोणतीही अडचण उरणार नाही. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात दिल्यास मागील काळात जो विकास झाला नाही, तो विकास आता करून दाखवू” कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा. अशोक चव्हाण यांनी केले. ते हिमायतनगर शहरात भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी (दि. 05 नोव्हेंबर 2025) रोजी आयोजित उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन चायल, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Shiv Sena’s Mashal : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची मशाल पुन्हा धगधगणार!

Shiv Sena’s Mashal : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची मशाल पुन्हा धगधगणार!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| आज दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज व इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. हिमायतनगर शहरातील बालाजी विद्यालयात आयोजित मुलखती कार्यक्रमास तालुकाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष संघटनेचे बळ वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची मशाल पुन्हा तेजोमय करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. याव...
Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : ‘भावी’ंची सोशल मीडियावर चलती..!

Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : ‘भावी’ंची सोशल मीडियावर चलती..!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) अखेर नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून, 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल हाती येणार आहे. तारखा जाहीर होताच हिमायतनगरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच शहरात उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले आहे. अजून अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी सोशल मीडियावर मात्र “भावी नगरसेवक”, “भावी नगराध्यक्ष” आणि “भावी उपनगराध्यक्ष” अशी पदवी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची जोरदार चलती सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की — कोण प्रत्यक्ष रिंगणात उतरणार आणि कोण मैदानातून बाद होणार? सोशल मीडियावर ‘भावी’ंची झंझावाती मोहीम फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि रील्सवर “भावी” उमेदवारांची प्रचारयात्रा रंगली आहे. बॅनर, पोस्टर, रील्स आणि शुभेच्छा संदेशांमधून अनेकांनी आपली राजकीय ओळख मजबूत करण्यास सु...
error: Content is protected !!