हिमायतनगर, अनिल मादसवार| “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मजबूत सत्ता आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर आमचे सरकार असल्याने विकासकामांसाठी कोणतीही अडचण उरणार नाही. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात दिल्यास मागील काळात जो विकास झाला नाही, तो विकास आता करून दाखवू” कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा. अशोक चव्हाण यांनी केले.


ते हिमायतनगर शहरात भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी (दि. 05 नोव्हेंबर 2025) रोजी आयोजित उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन चायल, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.



यावेळी पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मजबूत सत्ता आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर आमचे सरकार असल्याने विकासकामांसाठी कोणतीही अडचण उरणार नाही. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात दिल्यास मागील काळात जो विकास झाला नाही, तो विकास आता करून दाखवू”


त्यांनी पुढे सांगितले की, “भाजप ही केवळ राजकारण करणारी पक्षसंस्था नाही, तर विकास आणि जनसेवा हाच आमचा हेतू आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे, ग्रामीण भागातील सुविधा वाढविणे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या आमच्या प्राथमिकता आहेत.” यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना शेतकऱ्यांना तसेच लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या योजनानबाबत माहिती दिली.


यावेळी खासदार चव्हाण यांनी हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले की, “भाजपचे कार्यकर्ते हे संघटनेचे बळ आहेत. एकदिलाने आणि संघटित पद्धतीने काम केल्यास येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचा झेंडा नक्की फडकणार आहे.”

हिमायतनगर येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला तसेच अशोकराव साब तुम आज बढो हम तुम्हारे साथ है…. “जय भाजप, जय महायुती” आणि “विकासाचा वारा – अशोक चव्हाण आमचे तारा!” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उत्साहाचे रूप दिले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाला भाजप स्थानिक महिला – पुरुष पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
या भव्य उद्घाटनाने हिमायतनगर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीच्या संघटनेला नवे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या या नव्या जनसंपर्क कार्यालयातून पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
भाजपच्या दुसऱ्या गटाने अशोकराव चव्हाण यांचे केले जंगी स्वागत
दरम्यान भाजपमध्ये दोन गट असल्याचे उघड झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणुका अनुषंगाने हिमायतनगर वाढोणा नगरीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांचे आगमन होताच भाजपच्या दुसऱ्या गटाचे जिल्हा सचिव आशिष सकवान, माजी सभापती गजानन तुपतेवार, विधानसभा अध्यक्ष राम सूर्यवंशी, सरपंच सुधाकर पाटील, पवन करेवाड, सोसायटी चेयरमन, ग्रामपंचायत सदस्य यांनी शहरातील मुख्य स्वागत कमानीजवळ चव्हाण यांचे जंगी स्वागत करून हम भी कुछ कमं नहीं.. हे दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा या निमित्ताने होते आहे.



