Ward Reservation Release : महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने एकुण २० प्रभागातील ८१ जागेसाठी मंगळवार दि.११ नोव्हेंबर २५ रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे पार पाडण्यात आली. पालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांपैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा यापूर्वीच निश्चित झालेल्या असल्यामुळे केवळ संबंधित प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागेसाठी आरक्षण सोडत यावेळी काढण्यात आली आहे.
डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे,यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु, निवडणूक विभागाचे उपआयुक्त नितीन गाढवे व सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांनी आरक्षणा प्रक्रियेचा सर्व मसुदा उ...








