Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Himaytnagar Politics : निवडणुकीच्या रणधुमाळीने शहर तापले – सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Himaytnagar Politics : निवडणुकीच्या रणधुमाळीने शहर तापले – सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षीय रणनीती, शक्ति प्रदर्शन आणि यादवी राजकारणाला चांगलीच धार आली आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, नगरसेवकपदासाठी तब्बल १०२ अर्ज दाखल झाल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. रविवार पर्यंत ११० अर्ज दाखल झाले असून, आज (सोमवार) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय परिसरात सर्वच पक्षांच्या इच्छुकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. उमेदवारांचे वाजतगाजत रोडशो, शक्ति प्रदर्शन, समर्थकांचे जल्लोष यामुळे तहसील कार्यालय निवडणुकीचे रणांगणच झाला आहे. पक्षांतर्गत तणाव शिगेला – एबी फॉर्मची प्रतीक्षा कायम - नगराध्यक्ष पदाचा “एबी फॉर्म” कोणाला मिळणार याबाबत सर्वच पक्षांत उत्सुकता असून, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ग...
Vishal hanwate : हिमायतनगर वार्ड क्रमांक सातमधील जनतेचा विश्वास — युवा नेतृत्व विशाल हानवते चर्चेत

Vishal hanwate : हिमायतनगर वार्ड क्रमांक सातमधील जनतेचा विश्वास — युवा नेतृत्व विशाल हानवते चर्चेत

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात हिमायतनगरच्या स्थानिक राजकारणात नवीन घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच नांदेड जिल्हा युवा सहसचिव विशाल हानवते हे वार्ड क्रमांक सात मधील भावी नगरसेवक पदाचे प्रमुख दावेदार म्हणून जोरदारपणे पुढे येत आहेत. विशाल हानवते यांच्या नावावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेची जोरदार लगबग सुरू असून, युवकांच्या नेतृत्वाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. समाजकार्य, प्रामाणिकपणा, स्पष्ट भूमिका आणि विकासासाठी असलेली बांधिलकी या गुणांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या नावाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक संघटनातही हानवते यांचा प्रभाव सतत वाढत असून, बदल आणि विकासाचा चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे. वार्ड क्रमांक स...
Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| स्थानिक राजकारणात मोठा भूकंप घडवणारा दावा करत बहुजन समाज पार्टी (बसपा)चे मराठवाडा झोन अध्यक्ष मनीषभाऊ कावळे यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीत “हत्तीचा झेंडा नगरपंचायतीवर नक्कीच फडकणार” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. हिमायतनगर शहरातील बसपाच्या आयोजित विशेष बैठकीला चंद्रप्रकाश देगलूरकर, उत्तमदादा गायकवाड पळसपूरकर, दिगंबर मोरे, मिलिंद बनसोडे, साहेबराव डाकोरे, सुधाकर सरोदे, सुभाष भोकरे,  सकाराम ईगोले, सटवाजी सोनकांबळे, एडव्होकेट गोणारे, डॉ मनोज राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य फेरोज खान, हिदायतखान पठाण, बसपा तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर, तसेच विविध सामाजिक-पक्षीय कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. या उपस्थितीमुळे स्थानिक राजकारणात बसपाची ताकद झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बैठकीत मनीषभाऊ कावळे यांनी सांगितले की,“हिमायतनगरच्या जन...
Kandhar news  : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

Kandhar news : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे वातावरण कंधारात तापले असून, काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी न.पा उपाध्यक्ष मन्नान चौधरी, जफर उल्ला खान यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काल नांदेड येथील साई सुभाष निवास स्थानी जाहीर पक्षप्रवेश केला. तर दुसऱ्याच दिवशी कंधार भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ॲड. जयमंगला औरादकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस देऊबाई गोरे, भाजपा तालुका उपाध्यक्षा सौ कल्पना गीते, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे संचालक गिरीश मामडे, शैलेश मामडे, नरहरी जिंके यांनी आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कंधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाल्याचे चित्र कंधार शहरात निर्माण झाले असून इतर पक्षांना मोठी चपराक बसल्याची चर्चा कंधार श...
Nomination : रविवार सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे भरता येणार

Nomination : रविवार सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे भरता येणार

नांदेड, राजकीय
नांदेड| नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा 4 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्दी केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतु संगणक प्रणालीमध्ये स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तसेच नामनिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत, अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवरील भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तीनही दिवस (रविवार 16 नोव्हेंबर 2025) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळ (ऑनलाईन) तसेच पारंपारिक (...
Dr. Rajendra Wankhede : हिमायतनगर भाजपाला बळकटी! डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचा भव्य प्रवेश — नगराध्यक्ष पदाची उमेदवारी चर्चेत

Dr. Rajendra Wankhede : हिमायतनगर भाजपाला बळकटी! डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचा भव्य प्रवेश — नगराध्यक्ष पदाची उमेदवारी चर्चेत

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार | आज हिमायतनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे हिमायतनगर भाजपाच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉक्टर वानखेडे सारख्या स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती भाजपने निवडला असल्याने यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप सत्ता काबीज करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉ. वानखेडे यांचा पक्षप्रवेश हा केवळ औपचारिकता नसून, आगामी हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटीत मोठी वाढ होईल, तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असलेल्या डॉ. वानखेडे यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा पक्षाला मिळणार आहे. राजकीय सूत्रांच्या मते, आगामी निवड...
Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग

Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) मागील पाच वर्षांपासून रखडलेली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अखेर रंगात येताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी तब्बल १६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. चार दिवस शांत असलेले वातावरण अचानक गजबजले आहे आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. ★ उमेदवारीसाठी मनधरणी, दबाव-तणाव आणि पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली - हिमायतनगरमधील सर्व १७ प्रभागांत इच्छुकांची भिस्त वाढलेली असून, काहीजण वरिष्ठ नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तर अनेक जण आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत वजन वापरत आहेत. ज्यांना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे, ते दोन–तीन पक्षांतून तिकीट मागत आहेत. काहींनी तर पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याचे समजते. त्यामुळे अनेक...
Bsp Meeting : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत बसपाचा दमदार प्रवेश होणार

Bsp Meeting : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत बसपाचा दमदार प्रवेश होणार

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आपली रणनीती अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर नगरपंचायतीतील सर्व 17 नगरसेवक जागा तसेच एक नगराध्यक्ष पद बसपा उमेदवार लढविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धम्मपाल मनेश्वर यांनी दिली. या संदर्भातील महत्वाची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली असून अधिकाधिक इच्छुक, अभ्यासू कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत बसपा मजबूत पायाभरणी करणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीमुळे मिळत आहेत. नांदेड जिल्हा बसपा निवडणूक नियंत्रण समन्वय समिती जाहीर मुंबई येथे बसपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खा. राजारामजी (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नगरपरिषद व न...

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या निवडणूक कार्यक्रमात रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत का यासंदर्भात विचारणा होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून वरीलप्रमाणे हे निर्देश प्राप्त झाले आहेत....
सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास पाटील तांबोळी तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव पाटील मोरे यांची निवड

सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास पाटील तांबोळी तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव पाटील मोरे यांची निवड

नांदेड, राजकीय
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे जोशीसांगवी ता. लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वानुमते नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक असलेले रामदास सयाजीराव तांबोळी यांची तर व्हा.चेअरमन म्हणून नामदेव बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वाजतगाजत गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर मा.जि.प. सदस्या यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. दि. १३ नोव्हेंबर २०२५ गुरुवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी सहायता लोहा कार्यालयाचे अधिकारी डी. एस. कांबळे श्रेणी २ प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तेलंगवाडी येथी...
error: Content is protected !!