Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

IMG 20251116 092016 Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

हिमायतनगर, अनिल मादसवार| स्थानिक राजकारणात मोठा भूकंप घडवणारा दावा करत बहुजन समाज पार्टी (बसपा)चे मराठवाडा झोन अध्यक्ष मनीषभाऊ कावळे यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीत “हत्तीचा झेंडा नगरपंचायतीवर नक्कीच फडकणार” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

IMG 20251116 WA0012 Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

हिमायतनगर शहरातील बसपाच्या आयोजित विशेष बैठकीला चंद्रप्रकाश देगलूरकर, उत्तमदादा गायकवाड पळसपूरकर, दिगंबर मोरे, मिलिंद बनसोडे, साहेबराव डाकोरे, सुधाकर सरोदे, सुभाष भोकरे,  सकाराम ईगोले, सटवाजी सोनकांबळे, एडव्होकेट गोणारे, डॉ मनोज राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य फेरोज खान, हिदायतखान पठाण, बसपा तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर, तसेच विविध सामाजिक-पक्षीय कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. या उपस्थितीमुळे स्थानिक राजकारणात बसपाची ताकद झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

IMG 20251116 092027 Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा
Oplus_16908288

बैठकीत मनीषभाऊ कावळे यांनी सांगितले की,“हिमायतनगरच्या जनतेने पारंपरिक राजकारणाला कंटाळा आला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बसपाला यावेळी अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. नगरपंचायतीवर हत्तीचा झेंडा फडकवून जनतेच्या अपेक्षांचे शासन देऊ.”

IMG 20251116 092004 Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा
Oplus_16908288

बैठकीदरम्यान विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली, तर अनेकांनी पक्षात सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली. येत्या दिवसांत अनेक सक्षम कार्यकर्ते बसपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणूक समीकरणांवर बसपाची ही वाढती उपस्थिती निश्चितच हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

IMG 20251116 WA0007 Bsp Manishbhau Kavale : हिमायतनगरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा “हत्ती”चा दमदार आवाज — मनीषभाऊ कावळे यांचा दावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top