Gurukul Public School closed : गुरुकुल पब्लिक स्कूल बंद – १५० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
नांदेड| नांदेडमधील गुरुकुल पब्लिक स्कूल ही शाळा अनपेक्षितपणे बंद करण्यात आल्यामुळे, या शाळेला संलग्न असलेली ‘राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना’ देखील ठप्प झाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सुमारे १५० विद्यार्थ्यांवर झाला असून ते शिक्षणापासून वंचित झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेविरोधात मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या समोर उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्या स्पष्ट असून, शाळा व वसतिगृह पुन्हा सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा मार्गी लावावे, हा त्यांचा ठाम आग्रह आहे.
गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत एक महत्त्वाची शैक्षणिक सुविधा होती. विद्यार्थ्यांना येथे निवासासह शिक्षणाची संपूर्ण सोय करण्या...









