लोहा| राज्य सरकाने १०० दिवसांचे कार्यालयीन सुधारणा मोहीम अभियान राबविले यात नाशिक विभागीय स्तरावर शिरपूर उपविभागीय कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकविला.कार्यतत्पर उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक यांचा राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावळकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


कंधार उपविभागीय अधिकारी असतात मागील वर्षी लोकसभा निवडणूक पूर्वी डॉ शरदकुमार मंडलिक यांना महसूल दिनी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच राज्य निवडणूक आयोगाने बूथ पातळी पर्यत निवडणूक कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली यासाठी त्यांचा राज्यपातळीवर गौरव करण्यात आला.

राज्यात फडणवीस सरकार आल्या नंतर १०० दिवसांचे कार्यालयीन सुधारणा मोहीम” राबविण्यात आले .या अंतर्गत नाशिक विभागीय स्तरावर शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा द्वितीय क्रमांक आला .या विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक यांचा राज्याचे महसूल मंत्री ना . चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ प्रवीण गेडाम, नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम माजी शिक्षण मंत्री विधानपरिषद सदस्य आ अमरीश पटेल, यांची उपस्थिती होती तर आमदार काशिराम पावरा यांनी शिरपूर येथे स्वतंत्र कार्यक्रम घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक यांचा सत्कार केला .लोहा कंधार तसेच जिल्ह्यातील अधिकारी मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
