HomeनांदेडTwo Exam Center Cancelled ; कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी. फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द; नवीन...

Two Exam Center Cancelled ; कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी. फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द; नवीन परीक्षा केंद्र परभणी येथील प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी

नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ या परीक्षा चालू आहेत. हट्टा येथील एस.व्ही.पी. कॉलेज आणि डिप्लोमा इन फार्मसी इन्स्टिट्यूट या दोन महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत होते. विद्यापीठाच्या भरारी पथकाने दि.१४ मे रोजी सदर परीक्षा केंद्रास अचानकपणे भेट दिली. या दरम्यान दोन्ही परीक्षा केंद्रावर सर्वाधिक विद्यार्थी बिनधास्त सामुहिक नक्कल करत असल्याचे निदर्शनास आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर महोदयांनी ही बाब अत्यंत गंभीररित्या घेऊन तात्काळ दोन्ही परीक्षा केंद्राची मान्यता रद्द केली. आणि या दोन्ही परीक्षा केंद्रावरील सर्व परीक्षार्थींची परीक्षा दि.१६ मे पासून परभणीच्या प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी येथे घेण्यात येत आहे.

सर्व संबंधीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात बदल झाल्याचे लक्षात घेऊन दि.१६ मे पासून परभणीच्या प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी येथे उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments