Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

KYC process mandatory for MPSC candidates : एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

KYC process mandatory for MPSC candidates : एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे: 1. आधार ऑनलाइन ई-केवायसी, 2. आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, 3. आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, 4. नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे. अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश...
Manav Vikas Mission bus has provided : मानव विकास मिशनची बस सुरु झाल्याने घारापुर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार

Manav Vikas Mission bus has provided : मानव विकास मिशनची बस सुरु झाल्याने घारापुर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार

करियर, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील घारापुर येथील विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हेळसांड लक्षात घेता एस टी महामंडळाने सोमवार पासून मानव विकास मिशनची बस चालू केली आहे. पहिल्यांदा बस गावात येताच गावकर्यांनी व विद्यार्थ्यांनी चालक - वाचकांचे स्वागत करून यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांचे देखील आभार मानले आहे. मागील काही वर्षांपासून घारापुर येथील विद्यार्थ्यांची पावसाळ्याच्या दिवसात शाळेत ये जा करण्यासाठी होत असलेली अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडे मानवी विकासची बस चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दयानंद हाटे यांनी निवेदन देऊन केली होती. त्यांच्या मागणीला यश आले मिळाले असून, दिनांक २३ सोमवारपासून एसटी महामंडळाने बस चालू केली आहे. मानव विकास मिशनची बस पहिल्यांदा गावात आल्यामुळे गावकरी, नागरिक व विद्यार्थ्यांनी चालक जी सी राठोड, वाहक आर व्ही बारसे यांचे शाल...
Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आदरणीय शामराव जहागीरदार गुरूजी व आदरणीय वारकड गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हाडको नविन नांदेड येथील योग शिक्षीका सौ.संगीता बीडवई,सौ.कल्पणा गव्हाणे,प्रियंका कडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सौ.बीडवई यांनी योग व योगाचे महत्त्व विषद केले. सहज योगा चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले समता विद्यालया च्या विद्यार्थ्यां करवी करूण घेण्यात आले.या वेळी सर्व शिक्षक - शिक्षिका कर्मचारी यांनी योगासनाचे धडे घेतले.प्रसंगानुरूप सौ.बीडवई यांनी सहज योगा,मेडिटेशन कपालभाती, अनुलोम विलोम,पवनमुक्तासन ई. असनाचे प्रकार आणि त्यांचे महत्व पटवून दिले. योग शिक्षीकां यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यक्रमा नंतर विद्यालया तील योग शिक्षीका सौ.गौतमी कुलकर्...
Mrs. Sumantai Jironekar ; सौ. सुमनताई जिरोनेकर यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्का

Mrs. Sumantai Jironekar ; सौ. सुमनताई जिरोनेकर यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्का

नांदेड, करियर
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024-25’ या वर्षी सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि कथाकार सौ. सुमनताई गणपतराव जिरोनेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवा, सामाजिक भान आणि ग्रामीण पुनरुत्थानात दिलेल्या अनमोल योगदानाची दखल घेत शासनाने त्यांची निवड केली आहे. हा पुरस्कार दि. १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे एका भव्य समारंभात ना एकनाथराव शिंदे ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य ) यांच्या हास्ते तसेच ना संजय शिरसाठ ( सामाजीक न्याय मंत्री ) *मा ना भरतशेठ गोगावले ना.संजय राठोड. डॉ हर्षवर्धन कांबळे (सचिव सामाजिक न्याय विभाग ) आ. बांगर हिंगोली व मान्यवराच्या उपस्थितीत भव्य दिव्य समारंभात प्रदान करण्यात आला . सौ. सुमनताई जिरोनेकर या केवळ एक प्रतिभावा...
Dr. Shekhar Dordallu (Dorewad) ; स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती काही असो, प्रयत्न प्रामाणिक असावेत – नवनिर्वाचित डॉ शेखर डोरडल्लु (दोरेवाड)

Dr. Shekhar Dordallu (Dorewad) ; स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती काही असो, प्रयत्न प्रामाणिक असावेत – नवनिर्वाचित डॉ शेखर डोरडल्लु (दोरेवाड)

नांदेड, करियर
नांदेड l किनववट तालुक्यातील अंदबोरी या गावातून नवनिर्वाचित एमबीबीएस डॉक्टर शेखर भोजन्ना डोरडल्लु (दोरेवाड) यांचं सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. गोल्ला गोलेवार यादव समाजातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रात अखेर, शेखर डोरडल्लु यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अत्यंत गरीब परिस्थिती मध्ये डॉ शेखर बनला डॉक्टर.आई वडील शेतकरी अत्यंत हलाखीची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये कठोर परिश्रम मेहनत जिथे चिकाटीच्या जोरावर शेखर डॉक्टर प्रचंड मेहनतीने जिद्द असल्याने आणि शिक्षणामध्ये ध्येयवेडेपणा डॉक्टर म्हणून यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली आहे. वडील शेतकरी, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच डॉक्टर होणाचे स्वप्न होते अन् अखेर शेखर भोजन्ना डोरडल्लु दोरेवाड या मुलाने अतिशय मेहनत करून अभ्यास करून चिकाटीने ...
Assistant Police ; सीआरपीएफमध्ये डोंगरगावचे देवानंद सुकापूरेंची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

Assistant Police ; सीआरपीएफमध्ये डोंगरगावचे देवानंद सुकापूरेंची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

करियर, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा l तालुक्यातील डोंगरगाव या लहानशा गावातून अतिशय मेहनतीने पुढे येत, देवानंद सुकापूरे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), नागपूर येथे यशस्वी निवड मिळवली. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये सेवा बजावली असून, त्यांनी आसाम, दिल्ली, नागपूर, जम्मू-काश्मीर, श्रीनगर, छत्तीसगड आणि सध्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध ठिकाणी कार्य करताना त्यांनी उत्कृष्ट शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि कर्तव्यपरायणता दाखवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना प्रथम हवालदार (Havaldar) पदावर बढती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या प्रतिष्ठित पदावर पदोन्नती देण्यात आली. दि. 20 जून 2025 रोजी, सीआरपीएफ कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्...
Prohibitory orders : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Prohibitory orders : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

करियर, नांदेड
नांदेड| येत्या जून-जुलै मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेतील गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यातील 18 परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमीत केला आहे. या परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस व रविवार वगळून) सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी, परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतीरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिस कॅलक्यूलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटर पर्यंत परिसरात वापरण्य...
welcomes students : सम्राट अशोक प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत व सेल्फी पाॅईट ठरले आकर्षणाचे केंद्र

welcomes students : सम्राट अशोक प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत व सेल्फी पाॅईट ठरले आकर्षणाचे केंद्र

नांदेड, करियर
उस्माननगर| संपूर्ण राज्यामध्ये १६ जून रोजी पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली . शाळेच्या पहिल्याच दिवशी कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पफुल देऊन तर सेल्फी पाॅईट आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन्सिल चे वाटप करण्यात आले. प्रदिर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईट उभे करण्यात आले होते. हा सेल्फी पाॅईट आकर्षणाचे केंद्र ठरला. सम्राट अशोक प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सोव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले. सकाळी प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सोव सोहळ्याचे ...
Opportunity for students : शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश

Opportunity for students : शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश

करियर, नांदेड
नांदेड| अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी किनवट प्रकल्पाअंतर्गत मुलींचे 6 व मुलांचे 9 असे एकुण 15 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली आहेत, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. किनवट प्रकल्पातील जिल्हास्तर वसतीगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि तालुकास्तर वसतीगृहामध्ये इयत्ता 8 वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन परिपूर्ण कागदपत्रासह http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. प्रवेशाची प्...
Senior journalist Kanba Popalwar : पत्रकारांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे – ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार

Senior journalist Kanba Popalwar : पत्रकारांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे – ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार

करियर, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| पत्रकारितेत सोशल मीडियामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेत लगाम व भान ठेवने गरजेचे आहे. स्पर्धेमुळे इतरांचे नुकसान होणार नाही याची जण ठेऊन सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. चौथा आधार स्तंभ म्हणून सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने पत्रकारांकडे समस्या घेऊन येतात. जनसामान्यात पत्रकारांची प्रतिमा कायम चांगली राहावी यासाठी अन्याय अत्याचाला वाचा फोडण्याचे काम करायला हवे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार यांनी केले. ते हिमायतनगर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री परमेश्वर गोपतवाड यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आणि ओबीसी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मराठी पत्रकार संघाचे मुख्...
error: Content is protected !!