Homeक्राईमone-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी...

one-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| रात्रीची जंगलगस्त करीत असतांना भुलजा परिसरात अवैध वृक्ष तोड होत असल्याचा सुगावा लागला. कानोसाघेत घटनास्थळी जाऊन चार तस्तर हाती लागले तर अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केलेला पाचव्या तस्कराला चतुर्भूज करण्यास वनपथकाला यश मिळाले. सदर घटना बोधडी वनविभागाच्या कार्यकक्षेतील भुलजा कक्ष क्र.२१३-सर्वे नंबर ३३ मधील असून मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने तस्करांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत इटलोड (वनसंरक्षक,रो.ह.यो.व वन्यजीव नांदेड) यांच्या नियोजनात आणि सी.जी.पोतुलवार (वनपरिक्षेत्र अधिकारी, बोधडी) यांच्या नेतृत्वात २० सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असतांना नियतक्षेत्र भुलाजा कक्ष क्र. २१३ व. स. नंबर ३३ जंगलात अवैध वृक्षतोड होत असतानाचा सुगावा लागल्यामुळे वनपरिक्षेत्रातील त्या क्षेत्राचे वनपाल गंगाधर नीलपत्रेवार, वनरक्षक जी. एस. देवकांबळे, जी.पी.काळे, के.जी. माळी यांनी तातडीने सापळा रचून अवैध वृक्षतोड करणारे वनतस्कर प्रकाश मारोती सिडाम, माणिक माधव सिडाम, मारोती नागनाथ दराडे, राज नागनाथ गेडाम यांना सहा सागी नगासह दोन करवती जायमोक्यावर पकडल्या. त्यातील अंधाराचा फायदा घेऊन पळालेल्या विजय संजय गीते या तस्करास दुसऱ्या दिवशी अटक केली.

सदर वनगुन्ह्यात तपास कामी शेख याखुब वनपाल जकास, एस. एल.ढगे वनपाल पाटोदा, के.एम.बडूरे वनपाल थारा, डी. एन.गड्डे, एन.के. सुरणर, ए. एन. रंगे, एस. आर. वट्टमवार, के. एस. तलांडे, एन.पी. कोरडे, ए. टी. मधीकर, पी.डी.सोनुने, ए. ए. सपकाळ, कु. ए. एम.देशमुखे, कु. दुर्गा ढालके, सौ.सुजाता देवापुरे यांचा या पथकात समावेश होता. सदरील आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)(ड), २६(१)(फ), २६(१)(ई), ६४, ६५(अ), ६९, ७७ अन्वये प्र.गु.रि.क्रमांक ०४/२०२४ दि. २०/०९/२०२४ नुसार वनगुन्ह्याची नोंद करून माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अपिलीय न्यायालय, किनवट येथे दाखल केले असता तस्करांना न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची वन कोठडी सुनावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments