Thursday, May 14

Cyber ​​search of unknown accused : अर्धापूर येथील दाखल गुन्हयातील इन्सटाग्रामवरील अज्ञात आरोपीचा सायबरकडून शोध -NNL

नांदेड| जिल्हयातील अर्धापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. सदर गुन्हा हा संवेदनशील असल्याने गु.र.न. व पिडीतीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. ***/2024 कलम 354 (अ) भारतीय दंड संहिता सहकलम 67, 67 (अ) आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी नामे विशाल गजभारे याने फिर्यादीचे नावाने बनावट इन्सटाग्राम अकाऊंट बनवून इन्सटाग्रामवर मॉर्फ करुन फिर्यादीचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल केले होते.

सदर तक्रार सायबर पोलीस स्टेशन येथे प्राप्त होताच अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथील पोलीस निरीक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण, पो.हे.कॉ. / राजेद्रं राजलिंगराव सिटीकर, पो.हे.कॉ. दिपक रघुनाथ ओढणे, पो.कॉ./ किशोरकुमार सुभाष जैस्वाल, पो.कॉ./ ज्ञानेश्वर पांडूरंग यन्नावार यांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन वरील नमूद आरोपीची पूर्ण माहिती काढून अर्धापूर पोलीस स्टेशनला कारवाई करणेसाठी पाठवली.

अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम व पो.हे.कॉ. 1074 रुपेशकुमार शंकरराव नरवाडे यांनी सायबर पोलीस स्टेशन येथून वरील नमूद इन्सटाग्राम अकाऊंटची माहिती प्राप्त होताच आरोपीला तात्काळ ताब्यात घेवून सखोल तपास केला व आरोपीने वरील कृत्य मीच केल्याचे कबुली दिली आहे.

नांदेड जिल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, यांनी जिल्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मिडीया संदर्भात होत असलेल्या गुन्हे / तक्रारी बाबत लोकांनी निर्भयपणे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला येवून रितसर तक्रार दयावी. सदर कार्यावाही बाबत मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड मा.श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, डॉ. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!