नांदेड| महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नवी मुंबई यांचे मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयूक्त पूर्व परीक्षा 2024 हि परीक्षा आज दिनांक 01 जून, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एका सत्रात नांदेड जिल्हयात 37 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली.


या परीक्षेसाठी आयोगाचे निर्देशानूसार 37 उपकेंद्रप्रमुख, 09 समन्वय अधिकारी, ०२ भरारी पथक, ८५ मदतनिस, १४८ पर्यवेक्षक, ४७५ समवेक्षक, ८३ शिपाई, ७१ पाणीवाला, ३७ केअरटेकर यांची नियूक्ती करण्यात आली होती.

या परीक्षेसाठी एकूण ९६२३ परीक्षार्थी पैकी ६७५३ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८७० परीक्षार्थी अनूपस्थित होते. परीक्षा विनाव्यत्यय सुरळीत पणे पार पडली.
