Homeक्राईमillegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती...

illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

नांदेड| लिंबगाव पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करत
एकूण ₹8,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा असून, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याचा ठोस प्रयत्न आहे.

नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य रेतीच्या गोरखधंद्याला लगाम लावण्यासाठी अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी अवैध रित्या वाळू उपसा करुन चोरी करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव येथील सहा. पोलीस निरीक्षक पि सी. बोधनकर, पोलीस उपनिरिक्षक निजाम मुसा सय्यद, पोहेकों.मोरे, पोहेकॉ. हंबर्डे, पोहेकों. रामनवेनवाड, पोहेकॉ. सातारे, पोशि. टाक, पोशि. शिंदे व महसुल विभागाचे तहसिलदार संजय वारकड, नायव तहसिलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप यांनी संयुक्तीक कार्यवाही केली आहे.

IMG 20250722 WA0046 illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

दुपारी 13.30 वाजताचे सुमारास मौजे कोटोतिर्थ लगत असलेल्या नदीपात्रात छापा टाकला असता तेथे दोन तराफ्यावर दोन अनोळखी इसम इंजीनच्या सहाव्याने अवैधरित्या रेती उपसा चोरी करत असताना दिसुन आले. त्यांनी पोलीस पथकास पाहून नदीपात्रामध्ये उडीटाकुन पात्राच्या पलिकडे पोहत पळुन गेले. यायेथील दोन इंजिन प्रत्येकी किंमत चार लाख रुपये प्रमाणे एकुण किंमत आठ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाण्यात आणुन अवैध रेती उपसा करणार्या दोन अनोळखी इसमांवर कायदेशिर कार्यवाही केली.

तसेच कार्यवाही दरम्यान नदीपात्रालगत पाल ठोकुन राहणारे दुसऱ्या राज्यातील 12 मजुर हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त कामगीरी बद्दल पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी लिंबगाव पोलीस पथकाचे व महसुल पथकाचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments