Saturday, May 16

Tag: on illegal sand extraction from riverbed

illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

illegal sand : लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई ; नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपशावर धडक कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| लिंबगाव पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करत एकूण ₹8,00,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा असून, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याचा ठोस प्रयत्न आहे. नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य रेतीच्या गोरखधंद्याला लगाम लावण्यासाठी अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी अवैध रित्या वाळू उपसा करुन चोरी करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव येथील सहा. पोलीस निरीक्षक पि सी. बोधनकर, पोलीस उपनिरिक्षक निजाम मुसा सय्यद, पोहेकों.मोरे, पोहेकॉ. हंबर्डे, पोहेकों. रामनवेनवाड, पोहेकॉ. सातारे, पोशि. टाक, पोशि. शिंदे व महसुल विभागाचे तहसिलदार संजय वारकड, नायव तहसिलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप यांनी संयुक्तीक कार्यवाही केली आहे. दुपारी ...
error: Content is protected !!