Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Visit activities in schools : शाळांना भेटी उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकारी देणार शाळांना भेट

Visit activities in schools : शाळांना भेटी उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकारी देणार शाळांना भेट

करियर, नांदेड
नांदेड| शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेटी (Visit activities in schools) या विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी येत्या 16 जून रोजी, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या मतदारसंघातील किंवा जवळच्या शाळेला भेट देतील. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत सुविधा व कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल. जिल्ह्यातील सर्व 2 हजार 185 जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून यंदा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग या उपक्रमाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासन, पालक व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संब...
Chief Minister Devendra Fadnavis : विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लि...
Zilla Parishad : “हे पत्र २०३५ ला उघडून पहा” जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम

Zilla Parishad : “हे पत्र २०३५ ला उघडून पहा” जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यंदा पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील प्रारंभ अधिक गोड आणि संस्मरणीय ठरणार आहे. १६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत असून, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष “आठवणींचा फॉर्म” देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचे नाव, तालुका, विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांची नावे, विद्यार्थ्याने लिहिलेले पहिले मराठी व इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, त्याचे स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशा विविध गोष्टींची नोंद घेण्यात येईल. या फॉर्मवर “हे पत्र २०३५ ला उघडून पहा आणि आमची आठवण करा…” असा खास संदेश लिहिण्यात आला असू...
Saint Kabir National Award ; क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने त्रिरत्नकुमार भवरे सन्मानित

Saint Kabir National Award ; क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने त्रिरत्नकुमार भवरे सन्मानित

करियर, नांदेड
हिमायतनगर l बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष तथा. पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साप्ताहिक वृत्त वारसदार सा. हिमायतनगर क्राईम चे संपादक त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक ,सांस्कृतिक, पत्रकारिता कार्यातील योगदानाबद्दल त्यांना क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जिल्हा नागपूर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार प्रागणात दिनांक 11 जून 2025 रोजी संपन्न झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांकडून त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. (more…)...
Himayatnagar : हिमायतनगरला दहा वर्षांनंतर कायमस्वरूपी दुय्यम निबंधक मिळाले

Himayatnagar : हिमायतनगरला दहा वर्षांनंतर कायमस्वरूपी दुय्यम निबंधक मिळाले

करियर, नांदेड
हिमायतनगर| येथील दूय्यम निबंधक कार्यालय गेल्या दहा वर्षांपासून प्रभारी दुय्यम निबंधकावर कार्यालय सुरू होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कोमलताई कदम यांना कायमस्वरूपी दुय्यम निबंधक अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. याची माहिती मिळताच दिनांक १२ जुन रोजी हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसगी गजानन ऊमाटे, प्रभाकर नेवल पाटील, अनिल फाळके, कपील हटेकर, भगवान सावते, मनोज राऊत यांची ऊपस्थीती होती. हंगामी दुय्यम निबंधकापेक्षा कायमस्वरूपी त्याही युवा अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन रुजु झाल्यामुळे कामकाजात शेतकऱ्यांची कामे झिजीया करा विना होतील. अशी अपेक्षा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे....
Gangadhar Gaikwad elected : कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची उप संपादक पदी निवड – संपादक शंकरसिंह ठाकुर

Gangadhar Gaikwad elected : कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची उप संपादक पदी निवड – संपादक शंकरसिंह ठाकुर

नांदेड, करियर
नांदेड| चळवळीतील आणि सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय विश्लेषक कॉ.गंगाधर गायकवाड यांची दैनिक वीर शिरोमणीच्या उप संपादक पदी निवड करण्यात आल्याचे अधिकार व नियुक्तीपत्र संपादक शंकरसिंह ठाकूर यांनी दि. १२ जून रोजी प्रदान केले आहे. कॉ.गंगाधर गायकवाड यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी मागील तीस वर्षात अनेक वृतपत्रासाठी कार्यकारी संपादक, वृत्त संपादक पदी काम केले आहे. त्यांनी सीटू कामगार संघटनेच्या माध्यमातून शेकडो कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला असून त्यांना अनेक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने गरीब व गरजू लोकांना न्याय मिळावा म्हणून लेखन केले आहे. राज्य व केंद्रातील राजकीय परिस्थिती व भौगोलिक तथा ऐतिहासिक जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांच्या कार्याची व लिखाणाची नोंद घेत त्याच्यावर आपल्या दैनिकांची उप संपादक पदाची जबाब...
Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

नांदेड, करियर
हिमायतनगर| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, यात हिमायतनगर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्यावर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर येथील मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने गोपतवाड यांचं अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची जंबो कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही कार्यकारणी मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, ...
Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली

Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली

नांदेड, करियर, यवतमाळ
नांदेड| नांदेड जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. तर नांदेड येथे नूतन जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून अर्जुन झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट-अ संवर्गातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या 6 जून रोजी राज्य शासनाने केल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत सुधाकर आडे यांच्या निरोप समारंभ नुकताच घेण्यात आला. यावेळी नुतन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोराळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती तसेच जिल्हा नियोजन समितीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे 19 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड येथे रूजू झाले होते. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांनी कोरोना काळात आरोग्य विषयक बाबींवर ज...
Vijay Lohabande ; विजय लोहबंदे यांची एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

Vijay Lohabande ; विजय लोहबंदे यांची एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

नांदेड, करियर
नांदेड l एसएफआय विद्यार्थी संघटनेचे १९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नुकतेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे पार पडले. या अधिवेशनात एसएफआय विद्यार्थी संघटनेची नवीन कार्यकारणी करण्यात आली.यात नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आणि विद्यार्थी चळवळीतील एक परिचित चेहरा, विजय लेहबंदे यांची स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नांदेडसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी चळवळीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय लोहबंदे यांनी आजवर विद्यार्थी हितासाठी अनेक आंदोलने आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची तळमळ, संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सखोल जाण यामुळे ते विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने, व...
Shivswarajya Din ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा

Shivswarajya Din ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नांदेड l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत दिनांक ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिनानिमित्त संस्थेत राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या हस्ते स्वराज्याचे प्रतीक असलेल्या स्वराज्यगुढी उभारणीने झाली. यावेळी १५ फूट उंचीची स्वराज्यगुढी अष्टगंध, अक्षता, पुष्पहार व आंब्याच्या पानांनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी “राष्ट्रगीत” आणि “महाराष्ट्र गीत” सामूहिकरित्या गायले. या प्रसंग...
error: Content is protected !!