HomeकरियरNanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल...

Nanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित

उस्माननगर, माणिक भिसे l पोलीस विभागामध्ये सलग अठरा वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलीस अंमलदार सुशील कुबडे यांना महासंचालक सन्मान चिन्ह (पदक) देऊन सन्मानित केले आहे. सध्या कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलीस स्टेशनला आठ महिन्यापासून कार्यरत असलेले सुशील कुबडे हे पोलीस दलात २००७ मध्ये भरती झाले सून त्यांनी यापूर्वी पोलीस स्टेशन वजीराबाद येथे सहा वर्षे त्यानंतर जिल्हा विशेष शाखा नांदेड येथे सहा वर्षे उत्कृष्ट सेवा ( कर्तव्य ) बजावले आहेत .

तसेच सध्या आठ महिन्यापासून पोलीस स्टेशन उस्माननगर येथे बिट अमलदार म्हणून कामकाज पाहत आहेत त्यांनी आपल्या पोलीस खात्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस पदक देऊन त्यांना दि. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज कवायती मैदान वजीराबाद नांदेड येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची हस्ते पोलीस महासंचालक पदकांनी सुशील कुबडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

IMG 20250502 WA0001 Nanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे , नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप ,पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार , सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ,नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ,नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांची यावेळी उपस्थिती होती. यानंतर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमाहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुद्धा सुशील कुबडे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी त्यांचे कौतुक केले .

पोलीस महासंचालक पदी सन्मानित झाल्याबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप ,पोलीस अधीक्षक नांदेड, अविनाश कुमार ,खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर ,सुरज गुरव अतिरिक्त पोलीस अधीक्षक नांदेड सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड.

श्रीमती अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार ,उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक , पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडे सुनील सूर्यवंशी , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉ. लोपामुद्रा आनेराव पोलीस कर्मचारी शिवपूजे, अनिरुद्ध वाडे, माधव पवार, तिडके , पवार ,बाळासाहेब मस्के, बळवंत कांबळे, राम टेकाळे, नामदेव हंबर्डे ,मगदूम, ठाकूर, चव्हाण, रेजितवाड ,घोरपडे, महाबळे चिंचोरे , श्रीमती भाटकुळे, श्रीमती डोळे, श्रीमती वाघमारे, श्रीमती तारू, गृहरक्षक दलातील सर्व जवान, उद्धव घोरबांड, बाबाराव सोनसळे व पोलीस कर्मचारी यांनी पोलीस महासंचालक यांनी कुबडे यांना महासंचालक सन्मान चिन्ह देवून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments