Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Sant Kabir Award : चंद्रप्रकाश देगलूरकर, गंगाधर सोनटक्के, लोकेश कटारिया यांना संत कबीर पुरस्कार

Sant Kabir Award : चंद्रप्रकाश देगलूरकर, गंगाधर सोनटक्के, लोकेश कटारिया यांना संत कबीर पुरस्कार

करियर, नांदेड
अर्धापूर| अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, युवा पत्रकार गंगाधर सोनटक्के, नॅशनल भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया यांना क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून येत्या बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी नागपूर येथे या पुरस्कारांचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. क्रांतीकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जि. नागपूरच्या वतीने संत कबीर यांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त ११ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता संत कबीर वाचनालय कामठी नागपूर येथे राष्ट्रीय मेगा फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्यात नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक वक्ते सामाजिक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोणी ता. अर्धापूर जि. नांदेड येथील धडाडीचे युवा पत्रकार गंगाधर घनःश्याम सोनटक्के आणि नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश ...
Marksheets of 10th exam available in DigiLocker : दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध

Marksheets of 10th exam available in DigiLocker : दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 2025 डिजीलॉकर Digilocker मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध आहेत व मंडळाकडे अचुक नोंदविलेले आहेत त्यांच्या गुणपत्रिका APPAR-ID सोबत Link Digilocker Account मध्ये push करण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध नाहीत अथवा मंडळाकडे नोंदविलेले नाहीत त्यांच्या परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका Digilocker app मध्ये उपलब्ध करुन घेता येतील. यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी ...
Ganesh Bhau Gurupwar : युवा अटल फाउंडेशन नांदेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी गणेश भाऊ गुरूपवार यांची निवड

Ganesh Bhau Gurupwar : युवा अटल फाउंडेशन नांदेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी गणेश भाऊ गुरूपवार यांची निवड

करियर, नांदेड
नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील भाजपाचे युवा नेते श्री गणेशभाऊ गुरूपवार यांची 4 जुन रोजी युवा अटल फाऊंडेशन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर निवड ही अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय महामंत्री शितलजी खांडिल यांच्या आदेशानुसार व अटल फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष *गणेश रमेश राजे* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुर्वी गणेश भाऊ गुरुपवार यांनी भाजपा वाहतूक तालुका अध्यक्ष, व अखिल भारतीय पद्मशाली समाज तालुका युवक सचिव तथा भाजपा युवा मोर्चा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष नांदेड व तसेच भाजपाच्या वेगवेगळ्या पदावर उत्कृष्टरिता काम पाहिले. गणेश भाऊ यांच्या पाठीशी कुंडलवाडी व परिसरातील तरुणांची चांगली फळी उभी असुन, नांदेड जिल्ह्यात त्यांचा तळागाळात व परिसरात तगडा जनसंपर्क असुन गेली 20 वर्षापासून जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन गोरगरीब मायबाप जनतेची अहोरात्र मेहनत घेतली आहे ...
Triratna Kumar Bhaware : त्रिरत्नकुमार मा. भवरे यांना क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Triratna Kumar Bhaware : त्रिरत्नकुमार मा. भवरे यांना क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
हिमायतनगर| क्रांतिकारी संत कबीर यांची जयंती व राष्ट्रीय फेस्टिवल कार्यक्रमात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष पत्रकारत्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता आदी क्षेत्रातिल उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जिल्हा नागपूर द्वारा आयोजित क्रांतिकारी संत कबीर यांची 627 जयंती व राष्ट्रीय फेस्टिवल 2025 चे आयोजन दिनांक 11 जून 2025 रोजी सिद्धार्थ विहार प्रांगण भीमनगर कामठी जिल्हा नागपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीप नेवसे पाटील तर प्रमुख पाहुणे शत्रुघन प्रसाद सिंह सत्यशोधक शिवदास महाजन प्रदीप फुलझले राजू मेश्राम अँड .मयूर बोरकर लोकेश कटारिया गायत्री रामटेके मुरली मधुठेलम तर स्वागतअध्यक्ष कवी साह...
Dr. Uttam Sonkamble : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी डॉ. उत्तम सोनकांबळे यांची निवड

Dr. Uttam Sonkamble : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी डॉ. उत्तम सोनकांबळे यांची निवड

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2023-24 या वर्षासाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 10 जून 2025 रोजी मुंबई येथे राज्‍याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. डॉ. सोनकांबळे यांनी 33 वर्षांहून अधिक काळ नांदेड जिल्हा परिषदेत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत राहून समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ते भारत वानखेडे प्रणित अजुजाती/जमाती/विजाभज/इ.मा.व./वि.मा.प्र. या शासकीय-निमशासकीय संघटनेचे राज्य महासचिव म्हणून कार्यरत आहेत. या भूमिकेतून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्हा परिषदेमार्फत शाहू, फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्...
Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

करियर, नांदेड
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत येथील श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झाले असल्याने आज 6 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन व पंच परिवर्तन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नांदेड येथील या सोहळयास प्रमुख पाहूणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संजय तुंगार...
Maratha-Kunbi students : सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Maratha-Kunbi students : सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

नांदेड, करियर
नांदेड| मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज 16 जून 2025 पर्यत सादर करावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. अर्ज प्रक्रीया आणि मदत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्प्रिंग 2...
Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

नांदेड, करियर
देगलुर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मोजे सुंडगी येथे बोईनवाड परिवाराच्या व सुंडगी ग्रामस्थांच्या वतीने गंगाप्रसाद मुदिराज यांची मुंबई येथे अँटी करप्शन एसीपी या पदावर पदोन्नती मिळाल्यामुळे दिनांक ३१ मे रोजी शाल पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र दंडोड मा,पं,स,सदस्य, बंडु पाटिल,मुदिराज दतात्रय,सहशिक्षक दौलते सर, शादुलसाब शेख,गंगारेडी यालावार,सुभाष बोईनवाड,सहशिक्षक ‌ मधुकर बोईनवाड, संजय पाटील, उपसरपंच, दिलीप पाटील, मा,उपसरपंच, बाळासाहेब पाटील मा.सरपंच, शंकर पाटिल मा.उपसरपंच, युवराज कांबळे ,पोलीस पाटील ,तुकाराम कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष, मधुसूदन आवटी ग्रा,प,सदस्य चैनपुर, हावगीराव देशमुख, एकनाथ कायतवाड चैनपुरकर,कपिल देशमुख ,हणमंत तोटावाड मा.ग्रा.प, सदस्य, गंगाधर बरसमवार, मा,ग्रा,प,सदस्य ,शंकर बोईनवाड, आमोल गवलवाड, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प...
career opportunities ; स्पर्धेच्या काळात तरुणांना व्यावसायात मोठ्या करिअरच्या संधी – प्राणिताताई देवरे -चिखलीकर

career opportunities ; स्पर्धेच्या काळात तरुणांना व्यावसायात मोठ्या करिअरच्या संधी – प्राणिताताई देवरे -चिखलीकर

करियर, नांदेड
लोहा l आजच्या काळात सरकारी नौकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे.असा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय उभा करून त्यात करिअर करता येईल .रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आपण निवडलेल्या व्यवसायाला आधुनिकतेचा "टच"देऊन त्यात यश मिळविता येते असे मार्गदर्शन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले लोहा शहरात अन्वर पठाण या युवकांच्या फ्रेन्डस ड्रायक्लिनर्स च"चे उदघाटन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रविणताताई देवरे - चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ताजी वाले, माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार, अवि पाटील पवार, अशोक सोनकांबळे, सिकंदर शेठ, रशिदखॉ पठाण, आलमखॉ पठाण, अहेमद शेख, ऐजाज शेख, रमजान पठाण, सोहेल पठाण काबेगांवकर, अरबास शेख, रज्जाक शेख, खोलेद पठाण, समीर शेख, सरफराज लदाफ, ताहेर पठाण, अयान शेख, साहिल शेख, साहील पठाण व अजीस शेख आदींची उपस...
Shyam Jakkalvad ; गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे हिमायतनगर शहर अध्यक्ष पदी श्याम जक्कलवाड निवड

Shyam Jakkalvad ; गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे हिमायतनगर शहर अध्यक्ष पदी श्याम जक्कलवाड निवड

नांदेड, करियर
हिमायतनगर l हिमायतनगर- गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत हिमायतनगर गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे शहर अध्यक्ष म्हणून श्री श्यामजी जक्कलवाड यांची निवड समाजातील जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे.    श्याम जक्कलवाड यांनी समाजातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात, गोल्ला गोलेवार यादव समाजाचे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष म्हणुन जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट कामगिरी केली बजावली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडले असताना आदरणीय सुभाषरावजी शिल्लेवाड यांच्या सुचनेनुसार श्याम जक्कलवाड यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.  यावेळी राष्ट्रसंत द.भ.प.श्री. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर बरब...
error: Content is protected !!