Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Abhishek Bakewad ; गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड

Abhishek Bakewad ; गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड l गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बकेवाड यांची गोल्ला -गोलेवार महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड द.भ.प.राष्ट्रसंत महाराष्ट्र राज्याचे ब्रॅंड अम्बेसिटर स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर व समाजातील जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे. अभिषेक बकेवाड यांचे जिल्हास्तरावरील सामाजिक कार्य व महाराष्ट्रात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे उल्लेखनिय कार्य आहे असतात, महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा , कर्नाटक, मध्यप्रदेश, ईतर राज्यात यादव संगम त्यांनी समाजातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवक ...
Vikram Deshmukh : जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा विक्रम देशमुख यांनी पदभार स्विकारला

Vikram Deshmukh : जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा विक्रम देशमुख यांनी पदभार स्विकारला

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून विक्रम देशमुख (पतंगे) किल्लेवडगावकर हे मंगळवार 3 जून 2025 रोजी रुजू झालेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, अप्पर कोषागार अधिकारी विष्णु सुर्यवंशी, सहाय्यक संचालक श्रीमती सुनिता सुंकवाड तसेच जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी विशाल हिवरे, राज्य उत्पादन शुल्कचे लेखाधिकारी योगेश परळीकर यांनी त्यांचे स्वागत केले....
online admission process extended : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवली

online admission process extended : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवली

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने 31 मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे. या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित...
Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

नांदेड, करियर, तेलंगणा
नांदेड/हैद्राबाद। मूळचे महाराष्ट्राचे असलेले व सध्या तेलंगणात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी कार्यरत असलेले महेश भागवत यांना डॉ डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. शासनाच्या सेवेत कार्यरत असताना फार कमी अधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट दिली जाते. पण सध्या तेलंगणा राज्यात अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पदावर कार्यरत असणारे महेश भागवत यांना डी वाय पाटील विद्यापीठातर्फे ही मानद डॉक्टरेट एका भव्य समारंभात प्रदान केली आहे. भागवत हे मूळचे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आजवर अनेक लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यातून विविध पदांसाठी सुमारे 2 हजार तरुणांची निवड झाली आहे. भागवत यांनी मानवी तस्करी या विषयात मोठे भरीव काम केले आहे. बालकामगार या विषयावर देखील त्यांचे ...
Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, नवी मुंबई यांचे मार्फत महाराष्‍ट्र गट क सेवा संयूक्‍त पूर्व परीक्षा 2024 हि परीक्षा आज दिनांक 01 जून, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एका सत्रात नांदेड जिल्‍हयात 37 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी आयोगाचे निर्देशानूसार 37 उपकेंद्रप्रमुख, 09 समन्‍वय अधिकारी, ०२ भरारी पथक, ८५ मदतनिस, १४८ पर्यवेक्षक, ४७५ समवेक्षक, ८३ शिपाई, ७१ पाणीवाला, ३७ केअरटेकर यांची नियूक्‍ती करण्‍यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ९६२३ परीक्षार्थी पैकी ६७५३ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८७० परीक्षार्थी अनूपस्थित होते. परीक्षा विनाव्‍यत्‍यय सुरळीत पणे पार पडली....
Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

Devendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न

नांदेड, करियर, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र तुंगेनवार यांचा निरोप समारंभ कार्यकम हिमायतनगर येथील कार्यालयात शनिवारी दिनांक 31 रोजी थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा शाखा अभियंता मारोती डांगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय गुत्तेदार सुरेश पळशीकर, पोलिस निरीक्षक अमोल भगत, गुत्तेदार विकास पाटील देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी तुंगेनवार यांनी हिमायतनगर येथील उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार संभाळल्यापासून पूर्ण साढेतीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण केला. त्यांच्या कार्यकाळात अत्यन्त महत्वपूर्ण कामे झाली असून, पोलीस वसाहत, तहसील व बांधकाम कार्यालय निवासी इमारत, न्यायालय, पैनगंगा नदीवरील दोन पुलाची कामे यासह तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे विविध रस्ते, सभा...
Prafulla Kaudkar elected : प्रफुल्ल कऊडकर ह्यांची एसएफआयच्या नांदेड जिल्हा २५ व्या अधिवेशनात जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

Prafulla Kaudkar elected : प्रफुल्ल कऊडकर ह्यांची एसएफआयच्या नांदेड जिल्हा २५ व्या अधिवेशनात जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन आज बुधवार दिनांक २८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून झाली. अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेते कॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन माहूरचे प्रफुल्ल कऊडकर यांनी केले. अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजली वाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नव...
Nanded ; मराठवाड्यात प्रथम आलेल्या नांदेड तालुक्याचे तहसीलदार वारकड यांच्या विभागीय आयुक्त यांच्या हस्ते सन्मान

Nanded ; मराठवाड्यात प्रथम आलेल्या नांदेड तालुक्याचे तहसीलदार वारकड यांच्या विभागीय आयुक्त यांच्या हस्ते सन्मान

नांदेड, करियर
नांदेड l 100 दिवस मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत नांदेड तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम आला आहे,त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र, शाल,बुके देऊन श्री संजय वारकड तहसिलदार नांदेड यांचा छत्रपती संभाजी नगर येथे यथोचीत रित्या सत्कार करण्यात आला आहे. 30 में रोजी छत्रपती संभाजी नगर येथे एका सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला, या शुभ प्रसंगी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, पांडुरंग बोरगावकर अपर जिल्हाधिकारी नांदेड तसेच मराठवाड्यातील सर्व सन्माननीय जिल्हाधिकारी ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी ,सर्व निवासी उप जिल्हाधिकारी,उप जिल्हाधिकारी सामान्य,उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांची विशेष उपस्थिती होती....
office work : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर कार्यशाळेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

office work : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर कार्यशाळेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

करियर, नांदेड
नांदेड| कार्यालयीन कामकाजात उत्‍कृष्‍टता येण्‍यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, याविषयावर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचेवतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळांच्‍या तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांच्‍या निर्देशानुसार, निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 30 मे रोजी डॉ.शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन, मुख्‍य प्रेक्षागृहात कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर या विषयावर कार्यशाळा घेण्‍यात आली. महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळाचे विभागीय व्‍यवस्‍थापक विनायक कदम यांनी कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याअनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. पॉवर पॉइंट सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून विविध उपयोजन व टूल्‍स...
नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा

नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा

नांदेड, करियर
नांदेड| शासकीय प्रशासनात कार्यक्षमतेचा स्तर उंचावण्यासाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधीक्षक, सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्यासाठी आज कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले की, प्रशासकीय कामकाज अधिक सहज, सुलभ व परिणामकारक करण्यासाठी कृतीम बुद्धिमत्तेचा वापर अत्य...
error: Content is protected !!