HomeनांदेडMrs. Panchphula Hanmantrao Balde passed away due to prolonged illness : मुदखेडचे...

Mrs. Panchphula Hanmantrao Balde passed away due to prolonged illness : मुदखेडचे गटविकास अधिकारी बळदे यांना मातृशोक -NNL

नांदेड| देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता येथील मुळ रहिवाशी हल्ली मुक्काम शहरातील स्वप्नजा गार्डन येथे राहणार्‍या सौ. पंचफुला हनमंतराव बळदे यांचे दिर्घ अजाराने रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.

सेवा निवृत्त प्राध्यापक हणमंतराव बळदे यांच्या सौभाग्यवती पंचफुलाबाई ह्या गेल्या 22 वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या मातोश्री होत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, नायगांवचे गटविकास अधिकारी संजय मिरजकर, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे, प्रा.बसवंत रामशेट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्काराला माजी राज्यमंत्री डॉ. माधवरा किन्हाळकर, प्रा.जीवन वडजे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, अमितकुमार राठोड, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक ज्योती विनायक मेटे,गटविकास अधिकारी कैलास बळवंत, गटविकास अधिकारी पि.एम.जाधव, गटविकास अधिकारी संजय मिरजकर, प्रा. वसवंत रामशेट्टे, प्रा. शिवाजी डुमणे, ग्रामसेवक बि.एम. गमे, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे, बालाजी इंगळे, नितीन लाटकर, सतीश किन्हाळकर, मारोती पासवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments