Mrs. Panchphula Hanmantrao Balde passed away due to prolonged illness : मुदखेडचे गटविकास अधिकारी बळदे यांना मातृशोक -NNL
नांदेड| देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता येथील मुळ रहिवाशी हल्ली मुक्काम शहरातील स्वप्नजा गार्डन येथे राहणार्या सौ. पंचफुला हनमंतराव बळदे यांचे दिर्घ अजाराने रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.
सेवा निवृत्त प्राध्यापक हणमंतराव बळदे यांच्या सौभाग्यवती पंचफुलाबाई ह्या गेल्या 22 वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांच्या मातोश्री होत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत...
