उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथील महात्मा गांधी मिशन च्या वतीने सचिन बाजीराव पाटील गायकवाड यांना स्टार ऑफ एम.जी.एम.पुरस्कार श्री अबिनाश कुमार एसपी नांदेड यांच्या हस्ते एमजीएम महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले .


यावेळी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाटकर, महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ ऑफ कंप्युटर सायन्स आणि आयटीचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, उपप्राचार्या डॉ.कांचन नांदेडकर, बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. चेरकर, बीसीए विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता भोपी, बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गोंड धनंजय बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर, वर्गप्रमुख प्रा. रक्षंदा करकरे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्र परिवार तसेच सगे सोयरे यांच्याकडून सचिन पाटील गायकवाड यांचे अभिनंदन केले जात आहे.

