HomeकरियरDistrict Collector Rahul Kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी...

District Collector Rahul Kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

नांदेड| महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालिन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी वर्धा या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम, 2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी ‘सेवा दूत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा पुरविण्यासाठी विशेष कामगिरी केली.

या विशेष कामगिरीबाबत केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्थापित झाला आहे. या कामगिरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments