Thursday, May 14

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड | “नीट परीक्षा 2025” ही रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!