Wednesday, May 13

Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास

मुंबई, विशेष प्रतिनिधी| कौटुंबिक शोक आणि राजकीय अनिश्चिततेच्या कठीण काळातून जात असतानाही, पक्ष व राज्याच्या जबाबदारीसाठी पुढे येत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar takes oath as Deputy Chief Minister) यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी ठीक पाच वाजता राजभवनात पार पडलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव कोरले गेले. शपथ घेताना त्यांनी दिवंगत अजित पवार यांना स्मरून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी भावूक करणारा ठरला. राजभवनचा सेंट्रल हॉल “एकच वादा… अजितदादा!”
“अजितदादा अमर रहे!” अशा घोषणांनी भारावून गेला. या सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते, आमदार, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20260131 182956 Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास
Oplus_16908288

शपथविधीपूर्वी सरकारी निवासस्थान ‘देवगिरी’ येथे सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या छायाचित्राला वंदन करून राजभवनाकडे प्रस्थान केले. नव्या जबाबदारीची शपथ घेण्याआधी त्यांनी आपल्या जीवनसाथीला श्रद्धांजली अर्पण करत भावनिक स्मरण केले.

IMG 20260131 183025 Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास
Oplus_16908288

या क्षणी त्यांची संयमित पण ठाम भूमिका अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. कुटुंबीयांसह पक्ष कार्यकर्त्यांसाठी हा प्रसंग केवळ राजकीय नव्हे, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा साक्षीदार ठरला. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला असून, संकटातही जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश या घटनेतून स्पष्टपणे उमटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!