Homeआरोग्यHealth Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान...

Health Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

हिमायतनगर, अनिल मादसवार। दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या वतीने हिमायतनगर येथे दिनांक11 में रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात येत असते, त्याचं पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा येणाऱ्या11 मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालय परिसरात मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाबा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडपड करणे इत्यादी मेडिसिन तज्ज्ञांच्या मार्फत उपचार केले जाणार आहेत.

नेत्ररोग तज्ञ: डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी, सर्जरी तज्ज्ञ: हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्‌याचे आजार, मुतखड्‌याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड) इत्यादी. स्त्रीरोग तज्ञ – मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार इत्यादी, बालरोग तज्ञ – हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घसा तज्ञ – कान नाक घश्याचे सर्व आजार, अस्थिरोग तज्ञ – संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार, त्वचारोग तज्ञ : खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार, श्वसनरोग तज्ञ- दमा बरेच दिवसाचा खोकला तोंडाद्वारे पडणारे रक्ताचे ठसे, मुखरोग तज्ञ – दातांचे विविध आजार दुभगलेले पोट व टाळूचे आजार यावर उपचार केले जाणार आहेत.

शिबिराची वैशिष्ट्ये – शिबीर स्थळावर नोंदणी मोफत. तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी मोफत, भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) मोफत, महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल,अतिविशिष्ट चाचण्या (सि.टी. स्कॅन, एम. आर, आय इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत, डॉक्टरांच्या सल्यानुसार इ. सी. जी तपासणी मोफत केल्या जाईल. भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत दिले जाणार आहे.

रुग्णाचा आजार कुठल्याही सरकारी योजनेत येत असल्यास, सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल, रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल, या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल. फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जांभाडा) तसेच जन्मतःअसलेल्या मुखविकृतीवर शस्रक्रिया मोफत, गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्र्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत उपचार केले जातील. शिबीराच्या अधिक माहिती करिता गरजूनी मुरलीधर उमारे मो.9921112903 व आमदार बाबुराव कदम कोहळीकर जनसंपर्क कार्यालय, हदगाव व हिमायतनगर, मो. 9359121352, 6232323273 याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments