Thursday, May 14

Nanded ; महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटना, मुंबई चे अधिवेशन नांदेड येथे संपन्न “

नांदेड l महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय, मनोविकृती) संघटना मुंबई या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५, समाजसेवा विभाग,डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी, नांदेड व मराठवाडा विभाग यांच्या वतीने नांदेडमध्ये दिनांक २५.एप्रिल २५ रोजी संपन्न झाले .

या अधिवेशनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी, नांदेड या संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. सुधीर देशमुख हे अध्यक्ष तर वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कापसे हे प्रमुख पाहूने म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याव व विषेश साहाय्य विभाग लातूर श्री तेजस माळवदकर हे देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली, त्यानंतर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरिक आणि मागील तीन वर्षात निधन झालेले समाजसेवा अधिक्षक स्व.अवधूत तावडे व स्व.रमेश राठोड यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता यांनी आपल्या मनोगतात रुग्णालय व महाविद्यालयात काम करतांना समाजसेवा अधिक्षक हे पद अत्यंत महत्वाचे असून ते रुग्णालय प्रशासन व रुग्ण नातेवाईक तसेच समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो, तसेच रुग्णालयात कार्यरत असलेल्या देणगी समिती, सिएसआर कमिटी च्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती/संस्था यांच्या माध्यमातून रुग्णालय व विद्यार्थी कल्याणाकरिता मोठ्या प्रमाणात देणग्या उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न करतात, नुकतेच डॉ. शं.च.शा.वै. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता सिएसआरच्या माध्यमातून भारतीय स्टेट बैंक कडून ४० आसन क्षमतेची बस उपलब्ध करुन दिल्याचेही अधिष्ठांतांनी उल्लेख केला.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कापसे यांनी समाजसेवा अधिक्षक हे निराधार गरिव, अनोळखी रुग्णांना योग्य उपचारासाठी मदत मिळवून देणे, नातेवाईकांशी समन्वय साधने, समुपदेशन करणे, रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करणे इत्यांदी बाबतीत महत्वाची भूमिका बजावत असतात असे प्रतिपादन केले. प्रादेशिक उपायुक्त तेजस माळवदकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी ते म्हणाले की समाजसेवा अधिक्षक हे पदयुत्तर पदविधारक शैक्षणीक पात्रता धारक असल्याने, पात्रतेनुसार पदोन्नती व उच्च वेतनश्रेणी मिळण्याकरिता संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी या सभेच्या प्रास्ताविक प्रसंगी महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय, मनोविकृती) संघटना, मुंबई ही संघटना वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग तसेच सार्वजणिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या सबंध महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सलग्नीत रुग्णालये व जिल्हा रुग्णालये तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयात कार्यरत समाजसेवा अधिक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची शासनमान्य संघटना आहे. ही संघटना सन-१९९९-२००० या वर्षी स्थापन झाली असून या संघटनेचे वार्षीक अधिवेशन हे दरवर्षी वेगवेगळ्या जिल्हयात आयोजित केल्या जाते, यावर्षी हा मान नांदेडला मिळाला असे त्यांनी सांगितले.

संघटनेचे सचिव सतिश वाघ यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी अध्यक्ष आणि प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते मागील तीन वर्षात सेवानिवृत समाजसेवा अधिक्षकांचा तसेच उच्च पदविधारकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सभेचे सुत्रसंचालन गजानन वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेंद्र सुर्यवंशी यांनी मानले.

या सभेच्या दुसऱ्या सत्रात संघटनेच्या पुढील तीन वर्षाकरिता नबिन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी सर्वानुमते किशोर धर्माळे यांची अध्यक्ष म्हणून तर सतीश बाघ यांची सचिव पदी व उपाध्यक्ष म्हणून संतोष पवार यांची निवड करण्यात आली.तसेच विष्णु गायकवाड, लक्ष्मण मोरे, किरण कांबळे हेमंत भोयर, भाऊसाहेब माने, केवल शेंडे, गुणवंत रसाळ, सतिश नाईक इत्यादीची संचालक म्हणून नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवा अधिक्षक अर्जुन राठोड, संतोष मुंगल, अनिल नागमवाड, देवेंद्र जोग, विजय खरात, राजरत्न केळकर संदिप निळकंठे व मराठवाडा विभागातील सर्व समाजसेवा अधिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सभेची सांगता राष्ट्रगीताने करुन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटना, मुंबई यांच्यी सभा संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!