नांदेड| मगनपुरा नवा मोंढा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा सोनी पाटील यांनी आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात असंख्य महिला कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत नांदेड येथील गोकुळ नगर रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल मिडलँड येथे आयोजित पक्ष बैठकीत भाजपात पक्षप्रवेश केला.


यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,आमदार राजेश पवार ,आमदार तुषार राठोड भाजपाचे संघटन महामंत्री संजय कोडगे तसेच जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे ,किशोरजी देशमुख महानगराध्यक्ष अमर राजुरकर,देविदास राठोड,प्रवीण साले यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांची उपस्थिती होती.


यावेळी पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया देताना सदिच्छा सोनी पाटील म्हणाल्या की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक व विरोदत्त नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण आज अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणे व पक्षाचे कार्यक्रम तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच पक्ष देईल तो आदेश याप्रमाणे आपण काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सौ सदिच्छा सोनी पाटील यांच्या समवेत आज मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांसह त्यांच्या नेतृत्वात मगनपुरा,नवा मोंढा भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.
