Wednesday, May 13

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Gas Shortage : गॅस टंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना

Gas Shortage : गॅस टंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना

करियर, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा थेट परिणाम आता शिक्षण क्षेत्रावर दिसू लागला आहे. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मागील तीन दिवसांपासून खिचडी शिजवली गेली नसल्याने तब्बल ६०० विद्यार्थि शालेय पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळा दोन सत्रांमध्ये चालवली जात असून, विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या पोषणासाठी शालेय खिचडी हा महत्त्वाचा आधार आहे. मात्र गॅस उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाक पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाळजकर यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, "गॅस बुकिंग होत नसल्यामुळे खिचडी शिजवता आलेली नाही," अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, तीन दिवसांपासून पोषण आहार बंद असल्यामुळे विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होण्...
Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री

Nanded Book Festival : नांदेड ग्रंथोत्सव-2025 : वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दहा लाखांची ग्रंथविक्री

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 14 व 15 मार्च रोजी उत्साहात पार पडला. या ग्रंथोत्सवात वाचकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विक्रमी ग्रंथखरेदी केली असून, दोन दिवसांत सुमारे दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रंथप्रेमींना साहित्यिक मेजवानीसोबतच विविध प्रकाशनांच्या पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचक व ग्रंथालय चालकांना आवश्यक असलेली पुस्तके सहज मिळावीत या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशन, शांती पब्लिकेशन (पुणे), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचा ग्रंथप्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन (नांदेड), संदेश बुक डेपो (परभणी), प्रगती बुक डेपो (हिंगोली), मांडणीकर बुक डेपो (नांदेड), मराठवाडा बुक सेलर्स (नांदेड), ओमकार प्रकाशन (नांदेड व हिंगोली) आदींसह अनेक प्रकाशकांनी सहभाग घेतला होता. या ग्रंथप्रदर्शन व विक्र...
रामनवमीच्या पावन पर्वावर Nanank sai : शिर्डीत ‘नानक साई अवॉर्ड’चा भव्य सोहळा

रामनवमीच्या पावन पर्वावर Nanank sai : शिर्डीत ‘नानक साई अवॉर्ड’चा भव्य सोहळा

करियर, नांदेड
नांदेड | रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त यंदा शिर्डी येथे ‘नानक साई अवॉर्ड’चा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. साई भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीत हा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नानक साई फाउंडेशन (Nanak Sai Foundation) तर्फे आयोजित करण्यात येणारा हा सातवा ‘नानक साई अवॉर्ड’ सोहळा येत्या दिनांक २५ मार्च रोजी ‘विशाल साई भक्त संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात राज्यभरातील साई भक्त, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. फाऊंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे (Pandharinath Bokare) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या सोहळ्यात कला, संस्कृती, सामाजिक कार्य, अध्यात्मिक सेवा आणि ...
Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

करियर, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील एस.टी. महामंडळ कर्मचारी दत्तात्रेय दळवे यांची कन्या कु. हर्षदा दत्तात्रेय दळवे हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत हिमायतनगरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कु. हर्षदा ही सध्या हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयाच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात तिने नांदेड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे शहरी भागातून तिने हिमायतनगर शहराचे नाव उंचावले आहे. अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हर्षदाने हे यश संपादन केले असल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे म...
Navodaya entrance exam : ऑटो चालकाच्या मुलाने नवोदय प्रवेश परीक्षेत मिळविला जिल्ह्यात तिसरा क्रमांक

Navodaya entrance exam : ऑटो चालकाच्या मुलाने नवोदय प्रवेश परीक्षेत मिळविला जिल्ह्यात तिसरा क्रमांक

नांदेड, करियर
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) मौजे सवना (ज.) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील होतकरू विद्यार्थी सुरज देविदास अनगुलवार याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शाळा, गाव आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सवना गावातील एका ऑटो चालकाचा मुलाने अत्यंत साध्या परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. अश्या हलाकीच्या परिस्थितीत सुरजने आपल्या कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सुरजला शिक्षकांनी वेळोवेळी विशेष मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्याला सक्षम दिशा दिली. कोणतेही क्लासेस न लावता स्वतःच्या सातत्यपूर्ण अभ्यासा...
Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड| माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची खरी ताकद पुस्तक वाचनात असते. केवळ कायदे किंवा नियमांच्या आधारे समाजात बदल घडत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्य...
Himayatnagar Education Department :  हिमायतनगर शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनसेने केली चौकशीची मागणी तीव्र

Himayatnagar Education Department : हिमायतनगर शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनसेने केली चौकशीची मागणी तीव्र

नांदेड, करियर, राजकीय
हिमायतनगर/नांदेड| नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण विभागात भ्रष्टाचार व गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, काही शिक्षकांना अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी विविध पदांचा पदभार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही शिक्षकांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पेन्शन फाईल्स अडकवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रकारही स...
school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई | हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील शाळेच्या जागेबाबत निर्माण झालेला वाद अत्यंत गंभीर ठरत असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १२ मार्च २०२६ रोजी दुपारी विधानभवन, मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक Rahul Narwekar यांच्या दालनात झाली. बैठकीस Jaykumar Gore, Dadaji Bhuse तसेच आमदार Baburao Kadam Kohlikar यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांबाबत उद्भवलेल्या अडचणी, त्यावरील न्यायालयीन प्रकरणे तसेच शाळांच्या इमारतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः बनचिंचोली येथील प्रकरणासह राज्यातील जिल्हा परिषदांच्या मालकीच्या शाळांच्या जागांचा आढावा घेण्यात आला. ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पॅनेलवरील वकील कार्यरत आहेत, त्या ठिकाणी कामात कसूर झाल्यास संबंधित वकिलांवर कारवाई करण...
Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

नांदेड, करियर
नांदेड |  राज्यात सुरू असलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा शेवट बुधवारी झाला. परीक्षेच्या अंतिम दिवशी आपल्या नवजात तान्हुल्या बाळाला सोबत घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या मातेचा पीपल्स महाविद्यालयात विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला राज्यभर १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेचा समारोप बुधवारी झाला. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण ८६१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्यात आले होते. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथक आणि बैठे पथकाद्वारे काटेकोर देखरेख करण्यात आली. दरम्यान, परीक्षेदरम्यान पीपल्स महाविद्यालयात अत्यंत हृदयस्पर्शी घटना घडली. शितल चंद्रकांत चिते (वय २१) या मातेने आपल्या नवजात तान्हुल्या बाळाला घेऊन...
CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड, करियर
नवीन नांदेड़ l नाशीक येथे 35 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नाशिक येथील गायकवाड सभागृहात दरवर्षी देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्यावतीने प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड येथील सिडको भागातील अहिल्यादेवी महिला जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा भागीरथी मारोतराव बच्चेवार यांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषक सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दर तिनं वर्षाला होणारे राज्यस्तरीय 35 वे जेष्ठ अधिवेशन नाशिक येथील गायकवाड सभागृहात 8 व 9 मार्च रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व जेष्ठ नागरिक संघटनेचे राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोक तेरकर, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष डॉ. निर्मला कोरे,सचिव महामुने , माजी सचिव जयवंत सोमवाड ,सुनिता तेरकर यांच्या सह उतर मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.हंसराज वैध,राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प...
error: Content is protected !!