HomeकरियरNavodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात सहावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात सहावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

JNVST-2027 साठी 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड| पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST-2027) साठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारे आणि नांदेड जिल्ह्याचे बोनाफाईड रहिवासी असलेले विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे शिक्षण सलग पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याची जन्मतारीख १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीतील असावी.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार वैध जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

JNVST-2027 प्रवेश परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. अर्जाची अंतिम मुदत जवळ येत असल्याने पालकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. माण्डले यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती मिळविण्यासाठी प्रवेश अधिसूचनेतील QR कोड स्कॅन करावा. तसेच अधिक माहितीसाठी श्रीमती बबिता कुतुर (९१३०९७७९२१) किंवा विष्णू यादव (९९२६९२८७३२) यांच्याशी संपर्क साधता येईल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments