HomeकृषीPunyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ;...

Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ; लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार

जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, 

नांदेड| राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची व अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले आहे. 

या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १५८२ गावांमधील एकूण ९६ हजार ९२० पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा’ किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.

जिल्हा उपनिबंधक  यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधार संलग्नीकरण आणि प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची महत्त्वाची अट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातही ही प्रक्रिया अजून सुरु असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, असेही श्री. हिरे यांनी स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय कर्जमुक्ती लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे 
नांदेड तालुका,  ८४  गावे , ६५८२ शेतकरी, 
अर्धापूर तालुका, ५२ गावे, २४७९ शेतकरी, 
मुदखेड तालुका , ५५ गावे, ३९२५ शेतकरी, 
हदगाव तालुका , १५२ गावे, ६८३९ शेतकरी, 
किनवट तालुका , १८१ गावे, ९०५९ शेतकरी, 
माहूर तालुका, ८८ गावे, २४८१ शेतकरी, 
हिमायतनगर तालुका, ७१ गावे, ३९१९ शेतकरी, 
भोकर तालुका, ८२ गावे, ५९९७ शेतकरी, 
उमरी तालुका, ६६ गावे, ४२६० शेतकरी, 
धर्माबाद तालुका, ५६ गावे, ४१२६ शेतकरी, 
बिलोली तालुका, ९० गावे, ६१७० शेतकरी, 
नायगाव तालुका, ९१ गावे, ७२७५ शेतकरी, 
देगलूर तालुका, ११० गावे, ८५१२ शेतकरी,
मुखेड तालुका, १५१ गावे, ७८८६ शेतकरी,
कंधार तालुका, ११८ गावे, ७३५४ शेतकरी,
लोहा तालुका, १३५ गावे, १००५६ शेतकरी, 

असे जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १५८२ गावातील एकूण ९६,९२० शेतकऱ्यांची यादी शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments