HomeनांदेडHospital Funding : ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ‘एडीबी’कडून निधी देणार

Hospital Funding : ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ‘एडीबी’कडून निधी देणार

नांदेड| नांदेड येथील श्रेणीवर्धीत ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देऊन आशियाई विकास बँकेच्या आर्थिक साह्यातून निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

ही लक्षवेधी मांडताना आ. श्रीजया चव्हाण यांनी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांचा संदर्भा दिला. त्या म्हणाल्या की, या मानकानुसार १ हजार लोकसंख्येमागे किमान एक खाट असणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाखांहून अधिक असल्याने जिल्ह्यात एकूण ३ हजार ७०० खाटांच्या क्षमतेची शासकीय रुग्णालये असणे आवश्यक आहे.

मात्र, सद्यस्थितीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ५०८ खाटा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २१२ खाटा, महानगर पालिका रुग्णालये ५० खाटा तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये अशा नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची एकत्रित क्षमता केवळ १ हजार ९३० खाटांची आहे.

नांदेडला केवळ नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर लगतच्या हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातून तसेच तेलंगणातील निर्मल व आदिलाबाद जिल्ह्यातून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील प्रचंड ताण पाहता नांदेडच्या ५०० खाटांच्या श्रेणीवर्धीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन आशियाई विकास बँकेसारख्या वित्तीय संस्थांकडून निधीची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आ. श्रीजया चव्हाण यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी राज्य सरकार आशियाई विकास बँकेला सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या वित्तीय साह्यासाठी प्रस्ताव देणार असून, त्यातून नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

खा. अशोकराव चव्हाण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी तत्कालीन १०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ३०० खाटांच्या श्रेणीवर्धनाला मंजुरी व प्रशासकीय मान्यता मिळवली होती. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच दिवशी अनेक बालके व रुग्ण दगावल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाचे आणखी श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याची मागणी केली.

त्या मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ५०० खाटांचा शासन निर्णय निर्गमित केला होता. मात्र, नव्याने श्रेणीवर्धीत या रुग्णालयाला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आ. श्रीजया चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दाद मागितली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments