अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
नांदेड l अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हा शाखेची नवीन जिल्हा कार्यकारिणी एका बैठकीमध्ये आज घोषित करण्यात आली. देवगिरी प्रांताचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्ह्यातील ग्राहक हक्क संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत ग्राहक पंचायतच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात ग्राहक जनजागृती, मार्गदर्शन आणि कायदेशीर सहाय्य या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेने सक्रिय भूमिका बजावावी, असे मत व्यक्त करण्यात आले. ग्राहकांचे हक्क अबाधित राहावेत, बाजारपेठेतील गैरप्रकारांना आळा बसावा आणि सर्वसामान्य ग्राहकांना योग्य न्याय मिळावा यासाठी संघटनेची भूमिका अधिक बळकट करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊच्या नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल नगरसेविका सदिच्छा सोनी- पाटी...









