लोहा| आषाढी एकादशी निमिताने शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठलनामाचा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या निनादावर ठेका धरला, जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार संचालिका वंदनाताई पवार या उभयतांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन झाल्या नंतर ज्ञानदिंडीला आरंभ झाला जून्या शहरातून विठ्ठल नामाचा गजर करत पालखी निघाली.चिमुकल्याची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


आषाढी एकादशी निमिताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवछत्रपती प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वारकरी वेशभूषा धारण केली.डोक्यावर तुळशीवृंदावन , गळ्यात टाळ , आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष दिंडी निघाली. जिजामाता शिक्षण संस्थेन अध्यक्ष वसंतराव पवार, संचालिका वंदनाताई पवार यांच्या हस्ते विठूरायची पूजा झाली यावेळी नगरसेवक हरिभाऊ चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.


शाळेचे मुख्याध्यापक एच.जी. पवार, शिक्षिका मीनाताई कळकेकर, रामेश्वर जामगे, एम. एम आढाव यांनी पुढाकार घेवून हा नवोपक्रम राबविला. नगराध्यक्ष शरद पवार यांनी दिंडीत सहभाग घेतला,व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या उपनगराध्यक्ष करिम शेख,यांनी मान्यवरांचा सत्कार केला तसेच त्यांनी खाऊ वाटप केला. नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, नगरसेवक गणेश बगाडे, कैलास कहाळेकर यांनी अल्पोहार ठेवला होता. केंद्रप्रमुख चंद्रकांत वाडकर, जेष्ठ शिक्षक डी एम कहाळेकर, मुख्याध्यापक किशन काळे, केंद्र मुख्याध्यापक पापुरवार हे सहभागी झाले होता.



दिंडीत भक्तीगीत, भारुड या गीतावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षिका मीनाताई कळकेकर -पवार यांनी विद्यार्थ्यांना गाईड केले. या दिंडीमुळे जुन्या शहरातभक्तीमय सकाळ अनुभवायला मिळाली विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

