HomeनांदेडHonored : लोहा भूमीचा अभिमान! कृषी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा...

Honored : लोहा भूमीचा अभिमान! कृषी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा गौरव

लोहा (प्रतिनिधी) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असलेले भूमिपुत्र पद्माकर मधुकरराव पाटील यांचा लोहा येथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी नगराध्यक्ष शरद पाटील पवार आणि उपनगराध्यक्ष करीम शेख यांनी श्री. पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. “आपल्या गावातील भूमिपुत्र उच्च पदावर कार्यरत असून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार नगराध्यक्षांनी व्यक्त केले.

शैक्षणिक कारकीर्द ठळक
पद्माकर पाटील हे जिल्हा परिषद हायस्कूल, लोहा येथील माजी विद्यार्थी असून १९८७ च्या एसएससी परीक्षेत ते तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांनी पुढील शिक्षणही परभणीच्या कृषी विद्यापीठातून पूर्ण केले असून सध्या ते सहायक कुलसचिव पदावर कार्यरत आहेत.

कुटुंबीयांची शैक्षणिक परंपरा
त्यांचे वडील मधुकरराव पाटील गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा दिली, तर त्यांच्या कुटुंबातही शिक्षणाची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळेच पद्माकर पाटील यांनीही शिक्षण व प्रशासन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या कार्यक्रमास माजी उपसभापती मारोती पाटील बोरगावकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसिकर, हरिहर धुतमल, भानुदास पवार, खादर मामू, दीपक रुद्रवार तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी वर्गमित्र महावीर काळेगोरे यांचाही सत्कार करण्यात आला.

‘प्रज्ञावंतांची भूमी’ म्हणून लौकिक
लोहा शहर हे प्रज्ञावंतांची भूमी म्हणून ओळखले जाते. विविध क्षेत्रात येथील युवकांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेक विद्यार्थी विदेशातही कार्यरत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पद्माकर पाटील यांच्या यशामुळे शहराच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments