heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

नांदेड | नांदेड जिल्ह्यासाठी मोठी औद्योगिक गुंतवणूक ठरणारा ४ हजार २५० कोटी रुपयांचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प साकार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सुमारे १,८०० ते २,००० थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले होते. आता ४,२५० कोटी रुपयांचा हेलीप्लांट प्रकल्प देऊन त्यांनी दिलेला शब्द पाळला, असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना नांदेडमध्ये या प्रकल्पासाठी सामंजस्य करार होत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने ‘रिटाव्हिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत हा करार केला असून, या अंतर्गत हेलिकॉप्टर निर्मिती, जुळवणी (असेंब्ली) आणि सुट्या भागांचे उत्पादन नांदेडमध्ये होणार आहे.

याशिवाय हेलिकॉप्टरसाठी आवश्यक अभियांत्रिकी सेवा, देखभाल व दुरुस्ती सुविधा देखील या प्रकल्पात उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक संधी निर्माण होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून, नांदेडचा हेलीप्लांट प्रकल्प हा त्याचाच भाग असल्याचेही खा. अशोकराव चव्हाण यांनी नमूद केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button