heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
नांदेड | नांदेड जिल्ह्यासाठी मोठी औद्योगिक गुंतवणूक ठरणारा ४ हजार २५० कोटी रुपयांचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प साकार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सुमारे १,८०० ते २,००० थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले होते. आता ४,२५० कोटी रुपयांचा हेलीप्लांट प्रकल्प देऊन त्यांनी दिलेला शब्द पाळला, असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना नांदेडमध्ये या प्रकल्पासाठी सामंजस्य करार होत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने ‘रिटाव्हिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत हा करार केला असून, या अंतर्गत हेलिकॉप्टर निर्मिती, जुळ...
