हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंडला चारी मुंड्या चीत करून हिंदुस्तान ने लगान वसूल केला

नांदेड| ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंडला चारी मुंड्या चीत करून हिंदुस्तान ने लगान वसूल केल्यामुळे हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना शनिवार दि.२९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथील तळमजल्यावरील मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात येणार असून सामना संपल्यानंतर विजयी जल्लोष करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १६ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा रोमांचकारी सामना होणार आहे.खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमरेकर यांच्या हस्ते प्रक्षेपणाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

१९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात.आतापर्यंत पन्नास षटकांचे ७ वेळा आणि ट्वेंटी २० विश्वचषकाचे ८ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले.२००७ आणि २०११ मध्ये भारताने एक दिवसीय विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी २० विश्वचषक २००७ मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते. यावर्षीच्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघ जिंकेल असा विश्वास जगभरातील सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे. उमरेकर हाइट्स शिवाजीनगर येथील तळमजल्या वर आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button