HomeनांदेडAccident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर...

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| सारखणी ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड नजीक दि.४ ऑक्टों.रोजी दु.४.३० वा.चे सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात माहुर शहरातील गोविंद गणपत शेवाळे ४५ वर्षे हा जागीच ठार झाला, तर पिंटू माणिक आत्राम हा जबर जखमी झाला आहे.

शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी पिंटू मानिक आत्राम वय २५ रा. अंबाडी ता. किनवट हा वाई बाजार वरून सारखणीकडे जात होता. त्याचवेळी गोविंद गणपत शेवाळे हा सारखणी वरून माहूरकडे येत होता त्या वेळी हा अपघात झाला. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. १५/२०२४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स. पो.नि.रमेश जाधवर हे पुढील तपास करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments