Thursday, May 14

Tag: One killed and one critically injured

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| सारखणी ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड नजीक दि.४ ऑक्टों.रोजी दु.४.३० वा.चे सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात माहुर शहरातील गोविंद गणपत शेवाळे ४५ वर्षे हा जागीच ठार झाला, तर पिंटू माणिक आत्राम हा जबर जखमी झाला आहे. शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी पिंटू मानिक आत्राम वय २५ रा. अंबाडी ता. किनवट हा वाई बाजार वरून सारखणीकडे जात होता. त्याचवेळी गोविंद गणपत शेवाळे हा सारखणी वरून माहूरकडे येत होता त्या वेळी हा अपघात झाला. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. १५/२०२४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स. पो.नि.रमेश जाधवर हे पुढील तपास करीत आहेत....
error: Content is protected !!