HomeBlogCollectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया...

Collectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आणि जेल भरो – NNL

नांदेड| क्रांती दिना निमित्ताने ८ ऑगस्ट रोजी माकप नांदेड शहर आणि तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको करीत जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं) च्या महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. यावेळी विविध व प्रलंबीत मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

२७ जुलै २०२३ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये एका घरातील एका व्यक्तीस सानुग्रह अनुदान देण्याचे शासन आदेश असताना लोकप्रतिनिधी यांनी दबाव आणून एका घरातील पाच ते सहा जणांना अनुदानाचा लाभ मिळवून दिला असून किमान चार करोड रुपयांचा निधी बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून संगणमताने अपहार केला आहे.आणि खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आले आहे. या अपहाराची चॊकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. मंजूर आणि पंचनामे तहसील कार्यालयास सादर केले आहेत त्या सर्वाचे अनुदान वाटप करावे.

ही मागणी घेऊन मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर माकप साखळी उपोषण सुरु असून दखल घेण्यात येत नाही. याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.यापूर्वी या मागण्यासाठी १३५ दिवस साखळी उपोषण करण्यात आले आहे. मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर येथे मागील पन्नास वर्षात प्लॉट्स पडले नाहीत तेथे प्लॉट्स पाडून २५० अर्जदारांना मोफत प्लॉट्स वाटप करावेत आणि घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्यात यावेत. विशेष म्हणजे वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून तसा ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने पारित केला आहे. जिल्हा व तालुका पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी मनमानी करीत आहेत. शेतू सुविधा केंद्र धारक मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन शिधा पत्रिका देत आहेत आणि ऑनलाईन करण्यासाठी पैसे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.

प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर नांदेड या बोगस शाळेवर कारवाई करावी व तेथे अद्यापणाचे कार्य केलेल्या शिक्षक आशा गायकवाड आणि केशव धोंगडे यांना तीस वर्ष कार्य केलेला मोबदला देण्यात यावा. मयत शालेय विद्यार्थी आनंद केंद्रे यांच्या कुटुंबीयांचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे व त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. आशा व गट प्रवर्तक ताईंना वाढीव मानधन देण्यात यावे. संजय गांधी निराधार योजनेतील तलाठी बी.टी.शेळके हे मागील अनेक वर्षांपासून शहर विभागात एकाच ठिकाणी कार्यरत आहेत त्यांची किनवट किंवा माहूर येथे बदली करावी. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत त्या अनुषंगाने कारवाई करावी.

मौजे पोखरभोशी ता.लोहा येथील मायक्रो फायनान्स पीडित महिलांना न्याय द्यावा व वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या खाजगी व्यक्तीवर कारवाई करावी. आदी मागण्या जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत.प्रशासन प्रलंबीत मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करीत रस्ता अडवून जेल भरो आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आले असून ७० आंदोलकांना अटक करण्यात आली होती.

यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, वजीराबादचे पोलीस निरीक्षक कदम यांनी अटकेची कार्यवाही केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन तासांनी सर्व आंदोलकांना कारवाई पूर्ण करून सोडून देण्यात आले. या जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ नेते कॉ. विजय गाभने, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड कॉ.श्याम सरोदे, कॉ.मारोती केंद्रे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.मंगेश वट्टेवाड आदींनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments