माहूर तालूक्यात डॉक्टर असोसिएशन कडून दवाखाने बंद ! कलकता घटनेचा निषेध -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज कॅम्पस्मध्ये ९ ऑगस्टच्या पहाटे एका पदव्युत्तर पदवीधर युवतीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. या अतिशय घृणास्पद कृत्यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. झालेल्या क्रुर घटनेचा तिव्र निषेध करत माहुर तालुक्यातील सर्व दवाखाने बंद ठेवले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर आंदोलन उधळणाऱ्या गुंडगिरीच्या पृष्ठभूमीवर, ‘आयएमए’ अर्थात इंडियन मेडिकल वैद्यकीय असोसिएशनने शनिवार, १७ ऑगस्ट रोजी निषेध दिन पाळून शनिवारी सकाळी ६ ते रविवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ अशा २४ तासांसाठी डॉक्टरांनी देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, १५ ऑगस्टला जेव्हा देशवासी स्वातंत्र्य दिन साजरा करीत होते, त्याचदिवशी एका मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली, तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीतेवर अत्याचार करून हत्या करण्यात आली त्या ठिकाणचेपुरावे नष्ट करण्यात आले. डॉक्टर्स विशेषतः स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्सच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासिनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणिआरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत.

या देशव्यापी संपाच्या अनुषंगाने माहूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनने शनिवारी सकाळी ६ वाजतापासून २४ तासांसाठी बंद मध्ये भाग घेतला व निवासी तहसीलदार राजकुमार राठोड,पोनी शिवप्रकाश मुळे यांना निवेदन दिले व आपण आमचा निषेध नोंदवुन प्रशासना पर्यंत वरिष्ठाना पोहचवावा अशी विनंती केली.यावर माहूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे डॉ, निरंजन केशवे, प्रसन्न पांडे, राजेश सामशेट्टीवार, उषा देशमुख,हर्षदा केशवे,सुभा डाखोरे, सुप्रिया गावंडे,जुनेद बावाणी, सय्यद वशीम जावेद,अरून मोरे, दिपक गावंडे,दिलीप पुरी,प्रकाश जैन,झनक मानकर, अभिजीत कदम, रविन्द्र काळे,आकाश जाधव, आनंद अडकिने,बाबा डाखोरे,अजय जाधव,अदिच्या सह्या आहेत

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button