माहूर तालूक्यात डॉक्टर असोसिएशन कडून दवाखाने बंद ! कलकता घटनेचा निषेध -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज कॅम्पस्मध्ये ९ ऑगस्टच्या पहाटे एका पदव्युत्तर पदवीधर युवतीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आली. या अतिशय घृणास्पद कृत्यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. झालेल्या क्रुर घटनेचा तिव्र निषेध करत माहुर तालुक्यातील सर्व दवाखाने बंद ठेवले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर आंदोलन उधळणाऱ्या गुंडगिरीच्या पृष्ठभूमीवर, 'आयएमए' अर्थात इंडियन मेडिकल वैद्यकीय असोसिएशनने शनिवार, १७ ऑगस्ट रोजी निषेध दिन पाळून शनिवारी सकाळी ६ ते रविवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ अशा २४ तासांसाठी डॉक्टरांनी देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टला ज...
