Wednesday, May 13

Give direct subsidy to smallholder farmers : रिठा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| रिठा ,रिठा तांडा व जलधारा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ऑनलाईन नोंद न केलेले व ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस, सोयाबीन अनुदान यादी मध्ये नावच समाविष्ट झाले नसून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.

ईस्लापूर परिसरातील रिठा व जलधारा येथील शेतकरी हे आदिवासी बहुल भागात राहत असून बरेच शेतकऱ्याकडे अँनड्रॉइड मोबाईल नसल्याने व काही शेतकरी अशिक्षित असल्याने बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असून काही शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन ई पीक पाहणी केली परंतु या शेतकऱ्याची देखील नावे यादीत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.

दि. 16 ऑगस्ट रोजी या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार नयना कुलकर्णी याची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले आहे . या निवेदनावर शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोहन जाधव, मोहन व्यंकटी, इंदल परसराम, उमेश देविसीग, सुंदर राठोड ,अविनाश रतन, प्रल्हाद चव्हाण, दत्ता नागोराव उत्तम गणू ,वसंत देवीसिंग ,विजय व्यंकटराव, नागोराव सखाराम, प्रमोद सुभाष, किशन भाऊराव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!